Mira Bhayandar News
Mira Bhayandar NewsSaam TV

Boy Dies After Falling From Terrace : गच्चीवर खेळणं जीवावर बेतलं; १३ वर्षीय मुलाचा खाली पडून मृत्यू

Mumbai News : नवघर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Published on

Mira Bhayandar News : भाईंदरमध्ये बिल्डिंगच्या गच्चीवरुन पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दु्र्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

भाईंदरच्या पूर्वेच्या बी.रोड. परिसरात पारिजात ही चार मजली इमारत आहे. याच इमारतीत राहणारा जतीन परमार हा मुलगा इमारतीच्या गच्चीवर खेळायला गेला होता. संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास तो गच्चीच्या कठड्यावर बसला असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. (Tajya Batmya)

Mira Bhayandar News
Kalyan News : कारागृहात कैद्याकडे मोबाईल; कारवाई न केल्‍याने कारागृह अधिक्षक निलंबित

घटनेनंतर इमारतीतील नागरिकांनी त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी अपमृत्यूची नोंद केल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश म्हसाळ यांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com