Crime News: मुंबई-गोवा महामार्गावर बंद कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपात असल्याचा संशय

ही घटना घातपाताची असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
Navi Mumbai Crime News:
Navi Mumbai Crime News:सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Navi Mumbai Crime News: मुंबई-गोवा महामार्गावर एक खळबळ उडवणारी एक घटना घडली आहे. एका चार चाकी गाडीत मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना घातपाताची असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास मुंबई-गोवा (Mumbai-goa) महामार्गावर एक ऑडी कार बऱ्याच वेळापासून उभी होती. स्थानिक व्यक्तींनी गाडीत डोकावले असता काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तात्काळ पनवेल तालुका पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीची काच फोडली. तेव्हा त्यात एक मृतदेह सापडला.

Navi Mumbai Crime News:
राहुल गांधींच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र तापलं; मुंबई, पुणे, नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन

मृतदेह ताब्यात घेतल्यावर प्राथमिक तपासात सदर व्यक्तीचे पाकीट आणि ओळखपत्र सापडले आहे. या मृत व्यक्तीचे नाव आणि पत्ता पोलिसांच्या हाती लागला आहे. संजय कार्ले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर यशवंत नगर तळेगाव दाभाडे येथील तो रहिवाशी असल्याचे समजले आहे.

Navi Mumbai Crime News:
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १८ तासांपासून ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

पनवेल (Panavel) तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सदर घटनेबाबत सांगितले की, लाल रंगाच्या ऑडी गाडीत ४४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह अढळून आला आहे. त्याच्या छातीवर काही जखमा आहेत. सदर मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील शोध सुरू आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com