Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अलिशान कारचा भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, चिमुकली थोडक्यात बचावली

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा टोल नाक्याजवळ भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली असून कारचालक गंभीर जखमी झाला आहे.
Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident NewsSaam TV

संजय जाधव, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना सुरूच आहे. आज सकाळी महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा टोल नाक्याजवळ भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली असून कारचालक गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg Accident News
Maharashtra Rain Update: राज्यासाठी पुढील तीन तास महत्त्वाचे; या भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता

अपघातातून तीन वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना सिंदखेडराजा (Buldhana) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बीएमडब्यू कार मुंबईहून नागपूरकडे निघाली होती. कार महामार्गावरून भरधाव वेगात जात असताना बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा टोलनाक्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला धडकली. या भीषण अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली.

तर चालकालाही गंभीर दुखापत झाली. अपघातातून ३ वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. समृद्धी महामार्गावर दररोज अपघातांच्या  (Samruddhi Mahamarg Accident) घटना घडत आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात  पोलीस (Police) निरीक्षक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

Samruddhi Mahamarg Accident News
Mumbai Crime News: प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध, तरुणीने गुपचूप उरकला साखरपुडा; नंतर घडली भयानक घटना

नेहा चव्हाण असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिस निरीक्षक महिलेचे नाव आहे. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त पोलिस हे परभणी येथून आरोपी घेऊन नागपूरकडे जाण्यासाठी निघाले होते. पांढरकवढा गावानजीक त्यांचे वाहन आले असता समोर जात असलेल्या एका ट्रकला त्यांच्या वाहनाने जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात पोलीस वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस कर्मचारी व आरोपी गंभीर जखमी झाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com