Maharashtra Rain Update: राज्यासाठी पुढील तीन तास महत्त्वाचे; या भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता

Maharashtra Rain Today: एकीकडे बळीराजा अवकाळीपासून नेमकी कधी सुटका होईल, याची वाट पाहत असताना दुसरीकडे एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
Maharashtra Rain Today
Maharashtra Rain TodaySaam TV
Published On

Maharashtra Rain Today: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत. परिणामी राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अवकाळीसह बऱ्याच जिल्ह्यांना गारपीटीचा तडाखा देखील बसला असून रब्बी हंगामातील शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान, एकीकडे बळीराजा अवकाळीपासून नेमकी कधी सुटका होईल, याची वाट पाहत असताना दुसरीकडे एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

येत्या दोन ते तीन तासांत राज्यातील काही भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसं ट्विट सुद्धा हवामान तज्ज्ञ केएस होसळीकर यांनी केलं आहे. होसळीकर यांच्या अंदाजनुसार, राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागांमध्ये येत्या दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट होईल.

Maharashtra Rain Today
Mumbai Crime News: प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध, तरुणीने गुपचूप उरकला साखरपुडा; नंतर घडली भयानक घटना

मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात सुद्धा राज्यात अवकाळीने थैमान घातल्याने बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. दरम्यान, आयएमडीने सुद्धा महाराष्ट्राला पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. या काळात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट सह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे.  (Breaking Marathi News)

मराठवाड्यासह विदर्भात जोरदार गारपीटीची शक्यता

विदर्भ, नाशिक , जालना भागात गारपीटीचा (Rain Alert) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत अवकाळीने नाशिकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता होसळीकर यांनी येत्या दोन ते तीन तासांत मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने बळीराजाच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.

Maharashtra Rain Today
Beed APMC Election: परळी, अंबाजोगाईत राष्ट्रवादीचीच हवा; "मैं हूँ डॉन..." गाण्यावर थिरकले धनंजय मुंडे, पाहा VIDEO

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

जालना जिल्ह्यात सलग ५ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Weather Updates) कोसळत आहे. जिल्ह्यातील काही गावांना गारपीटीचा तडाखा देखील बसला आहे. भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव महसूल मंडळातील अनेक गावात शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले असून सोंगून ठेवलेली मका अक्षरशः पाण्यात भिजली आहे.

मराठवाड्यात गाटपीटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह गारपीट, वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा १५३ गावांना फटका बसला असून १० जण वीज पडून ठार झाले आहेत. या सोबतच १ हजार १७९ कोंबड्या तर १४९ जनावरे दगवली आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्थांनी केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com