राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितिच्या निवडणुकीचे निकाल आज सुरू असून अनेक ठिकाणी भाजपने कमळ फुलवले आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारावेळी भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. मात्र, मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 अशा 15 ही जागा निवडून आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळमध्ये श्रेष्ठ आहे असे दाखवून दिले. भाजपने 15 पैकी 15 जागांवर लढून सर्वच ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. मावळमधून भाजपचा सुपाडासाफ झाला असे नागरिक म्हणू लागले आहे. एकेकाळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले होते की पुणे जिल्ह्यातूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार करू. मात्र आता भाजपच्याच या दारून पराभवामुळे भाजप संपला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे..
मावळ पंचायत समिती
टाकवे
१. प्राची देविदास गायकवाड
नाणे
२. अशा मोरमारे
वराळे
२. राजेश कडलक
इंदोरी
२. दिलीप ढोरे
खडकाळा
२. समीर जाधव
कार्ला
२. रेश्मा देवकर
कुसगाव
१. योगेश लोहर
काले
२. शैला कालेकर
सोमाटणे
२. साहेबराव कारके
चांदखेड
१. सुनीता येवले
२. अनंता पावसे
इंदोरी वराळे
१. पल्लवी दाभाडे
खडकाळा- कार्ला
२. दीपाली हुलावळे
कुसगाव बुद्रुक - काले
२. संतोष राऊत
सोमाटणे चांदखेड
१. मनिषा मुऱ्हे
जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 अशा एकूण 15 उमेदवार निवडून आणून मावळच्या जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवलेला आहे. नागरिकांनी दिलेला पाठिंबा आणि चांगले उमेदवार यामुळे आम्ही निवडून आलेलो आहे. भाजपला फक्त राजकारण करता येते, असं गणितच राजकारण करू नका बर्याचशा लोकांचे घर उध्वस्त करणारी भाजप आता यापुढे तरी अशा पद्धतीने वागू नका असा सल्ला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.