कोकणात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ; कारण गुलदस्त्यात

Major Political Twist in Ratnagiri: भाजप पक्षातील जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सावंतांकडे रत्नागिरीची जबाबदारी होती.
Major Political Twist in Ratnagiri
Major Political Twist in Ratnagirisaam
Published On
Summary
  • रत्नागिरी - चिपळूणमधील राजकीय वर्तुळात खळबळ

  • राजेश सावंत यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

  • राजेश सावंत यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीची होती जबाबदारी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच रत्नागिरीतील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप पक्षातील जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राजेश सावंत यांच्याकडे रत्नागिरीची जबाबदारी होती.

रत्नागिरी चिपळूनमध्ये आज भाजप पक्षाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजेश सावंत यांनी राजीनामा सोपवला. राजेश सावंत यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीची जबाबदारी होती.

Major Political Twist in Ratnagiri
धक्कादायक! महिला काँग्रेस नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल, AIनं तयार केला अन्.. नेमकं घडलं काय?

राजेश सावंत यांनी राजीनामा का दिला? हे अद्याप समोर आलेले नाही. याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता सावंत नेमकं कोणत्या पक्षात जाणार? ते कुणाच्या संपर्कात आहेत? हे अद्याप समोर आलेले नाही.

Major Political Twist in Ratnagiri
महाआघाडीत भूकंप; शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडणार? तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय

रविंद्र चव्हाण यांची रत्नागिरी शहरात होणारी कार्यकर्ता बैठक रद्द झाली आहे. चव्हाण आता सिंधुदुर्गकडे रवाना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com