Nitesh Rane On Transgender : तृतीयपंथीयांच्या पुण्यातील आंदाेलनावर नितेश राणे म्हणाले, ताे शब्द, त्यांचा... (पाहा व्हिडिओ)

खरी राष्ट्रवादी कोणती हे जितेंद्र आव्हाड यांनी सांगावं असे नितेश राणेंनी म्हटलं.
Nitesh Rane, uddhav thackeray, balasaheb thackeray, transgender, pune, sindhudurg
Nitesh Rane, uddhav thackeray, balasaheb thackeray, transgender, pune, sindhudurgsaam tv
Published On: 

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर टीका करताना आमदार नितेश राणे (nitesh rane) हिजडा हा शब्द प्रयाेग केला. राणेंच्या या शब्द प्रयाेगावर तृतीयपंथी प्रचंड नाराज झाले आहेत. राणेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी तृतीयपंथी यांनी पुण्यात आंदाेलन छेडले आहे. दरम्यान या शब्द प्रयाेगावर आमदार नितेश राणेंनी मी नेमकं काय बाेललाे याची पडताळणी तृतीयपंथी यांनी करावी असे आज (बुधवार) पत्रकारांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

Nitesh Rane, uddhav thackeray, balasaheb thackeray, transgender, pune, sindhudurg
Success Story: खडकाळ जमिनीवर जांभळाची शेती बहरली; ॲमेझॉनवर मिळताेय किलाेला 200 रुपयांपासून 280 चा भाव

आमदार नितेश राणे म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांनी ठाणे येथील एका सभेत त्यांच्या भाषणात काॅंग्रेसच्या समाेर झुकणारे सर्व हिजडे असतात असे म्हटले हाेते.

त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख करीत मी स्पष्ट म्हटलं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी जसं काॅंग्रेस समाेर झुकणा-यांना हिजडे म्हटलं आहे म्हणजे उद्धव ठाकरे हे काॅंग्रेस समाेर झुकले आहे. उद्धव ठाकरे हे हिजड्यांचे प्रमुख आहेत. माझं वक्तव्य नीट समजून घ्यावे असे आवाहन राणेंनी तृतीयपंथी समुदायास केले आहे.

Nitesh Rane, uddhav thackeray, balasaheb thackeray, transgender, pune, sindhudurg
Ajit Pawar Apology : अजित पवारांची दिलगिरी, माझ्याकडून असे व्हायला नको हाेते...

दरम्यान आज पुण्यात तृतीयपंथी समुदायाने नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली. या आंदाेलनातील काहींना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.