BJP MLA: 'परप्रांतियांच्या मोर्चाचा हेतू वाईट नव्हता..पण मराठी लोकांचा मोर्चा..' भाजप आमदाराचं वक्तव्य चर्चेत

BJP MLA Narendra Mehta: मीरा भाईंदरमध्ये मराठी-अमराठी वाद पुन्हा उफाळून आला आहे. मराठी मोर्च्याला पोलिसांची बंदी, तर परप्रांतीय मोर्च्याला पाठिंबा दिल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
BJP MLA Narendra Mehta on Mira Bhayandar Marathi Morcha
BJP MLA Narendra Mehta on Mira Bhayandar Marathi Morcha Saam Tv News
Published On

मीरा भाईंदरमध्ये मराठी आणि अमराठी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी या मोर्च्याला परवानगी नाकारली. तरीही आंदोलक रस्त्यावर उतरले आणि काही काळासाठी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

दरम्यान, याच शहरात काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांनी मोर्चा काढला होता. त्या मोर्च्याला भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, मराठी मोर्च्याला त्यांनी कोणताही पाठिंबा दिलेला नाही.

मराठी एकीकरण समिती आणि मनसेच्यावतीने आज मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. यावेळी आंदोलकांची धरपकड झाली. दरम्यान, या मोर्च्यावर नरेंद्र मेहता यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. 'मीरा भाईंदरमध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मराठी एकीकरण समिती आणि मनसेनं मिळून केलेल्या मोर्चावर पोलिसांनी कारवाई केली असेल', असं नरेंद्र मेहता म्हणाले.

BJP MLA Narendra Mehta on Mira Bhayandar Marathi Morcha
Aadhar Card: लहान मुलाचं आधार कार्ड काढायचंय? ५ सोप्या स्टेप्स, घरीच मिनीटात होईल काम

दरम्यान, परप्रातियांच्या मोर्चाला मेहता यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, मराठी मोर्चाला त्यांनी पाठिंबा दर्शवला नाही. यावर मेहता म्हणाले,'परप्रांतीय लोकांच्या मोर्चाचा हेतू वाईट नव्हता. मात्र, मराठी मोर्चाच्या मागे, इतर राजकीय लोक असल्याची शंका आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नाही', असंही मेहता म्हणाले.

मराठी माणसाला मोर्चासाठी परवानगी दिले जात नाही, पण अमराठी लोकांना दिले जाते, या प्रश्नावर मेहता म्हणाले, 'माझ्या माहितीप्रमाणे अमराठी मोर्चाला परवानगी दिली नव्हती. परंतु, त्यांचा हेतू स्पष्ट होता. आमच्या लोकांना मारलंय. असं भविष्यात घडू नये. त्यावर कडक कारवाई करण्यात यावी, एवढीच त्यांची भूमिका होती. ते लोक एका सभागृहात संघटित झाले होते. कुणीही असभ्यता दाखवली नाही. मात्र, यांची भूमिका वेगळी दिसत आहे, दाखवायचं एक आणि करायचं एक अशी भूमिका दिसतेय', असंही मेहता म्हणाले.

BJP MLA Narendra Mehta on Mira Bhayandar Marathi Morcha
Sarpanch: 'बाबा, तुम्हीच आमचे विठ्ठल' वारीहून वडील परतले, सरपंच मॅडमच्या कृतीने वेधलं लक्ष; नेटकरी भावूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com