Gadchiroli MLA Demand for Cancel CSR Fund : गडचिरोलीचा विकास झालाय, CSRचा 30 टक्के निधी बंद करा; भाजप आमदाराची विधानसभेत अजब मागणी

BJP Mla Deoram Holi News : सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
Gadchiroli News
Gadchiroli News Saam TV
Published On: 

मंगेश भांडेकर

Gadchiroli News : राज्यात एकीकडे आमदारांच्या निधीवरुन गदारोळ सुरु असताना एका आमदाराने सीएसआर निधी बंद करण्याची मागणी केली आहे. पावसाळी अधिवेशनात निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराम होळी यांनी अतिदुर्गम, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला मिळणारा 'सीएसआर'चा 30 टक्के निधी बंद करा, अशी अजब मागणी केली आहे.

Gadchiroli News
Raj Thackeray News: मनसेकडून टोलनाक्याच्या तोडफोडीनंतर राज ठाकरे आक्रमक; अमित ठाकरेंसोबत त्या दिवशी काय घडलं?

गडचिरोलीचा विकास झाला आहे, त्यामुळे अतिरिक्त 30 टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत असल्याचा आश्चर्यकारक दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या या मागणीमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. (Latest News Update)

Gadchiroli News
Pune Terrorist : दहशतवादी घडवणार होते पुण्यात बॉम्बस्फोट; अटकेत असलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

तुझ्या एका मतावर निवडून येतो का?

विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच एका मतदाराला 'तुझ्या एका मताने निवडून येतो का? असे उद्धट उत्तर दिल्याची आमदार देवराम होळी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता विधिमंडळातच त्यांनी आदिवासी जिल्हा म्हणून 10 टक्के व अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून 20 टक्के असा 30 टक्के सीएसआरचा अतिरिक्त निधी दिला जातो.

परंतु गडचिरोलीचा विकास झाला असून आता या निधीची आवश्यकता नाही, अशा प्रकारची मागणी केल्याची चित्रफीत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com