Raj Thackeray News: मनसेकडून टोलनाक्याच्या तोडफोडीनंतर राज ठाकरे आक्रमक; अमित ठाकरेंसोबत त्या दिवशी काय घडलं?

Raj Thackeray Reaction On Toll Booth Vandalism: मनसे नेते अमित ठाकरे यांचा नाशिकच्या सिन्नर येथील टोलनाक्यावर ताफा अडवण्यात आला. यावरून संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी गोंदे टोलनाक्याची तोडफोड केली. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
Raj Thackeray Reaction On Amit Thackerays Car Block and Vandalism of Nashik Sinnar toll plaza
Raj Thackeray Reaction On Amit Thackerays Car Block and Vandalism of Nashik Sinnar toll plazaSaam TV
Published On

Raj Thackeray Reaction On Toll Booth Vandalism: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा नाशिकच्या सिन्नर येथील टोलनाक्यावर ताफा अडवण्यात आला. यावरून संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी गोंदे टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी ८ मनसैनिकांना अटक केली. त्यांची जामीनावर सुटकाही झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे.

Raj Thackeray Reaction On Amit Thackerays Car Block and Vandalism of Nashik Sinnar toll plaza
Shivsena 16 Mla Disqualification: १६ आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वात मोठी बातमी; राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय

निवडणुकीच्या काळात भाजपने टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते, त्याचं काय झालं याचा त्यांनी खुलासा करावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. हे जे टोलनाके आहेत ते म्हैस्कर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण लाडका आहे? हा कोणाचा लाडका आहे? यावरही त्यांनी बोलावं, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे आज (२६ जुलै) पुणे (Pune News) दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात मनसेच्या शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यासाठी ही बैठक होती. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी टोलफोड प्रकरणावर भाष्य केलं.

Raj Thackeray Reaction On Amit Thackerays Car Block and Vandalism of Nashik Sinnar toll plaza
Uddhav Thackeray On Shinde Group: 'माझं सरकार वाहून गेलं नाही, खेकड्यांनी धरण फोडलं', उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका

टोलनाका तोडफोडीनंतर काय म्हणाले राज ठाकरे?

अमित सध्या महाराष्ट्रभर दौरा करतोय. तो काही टोलनाके फोडत चालला आहे, असं काही नाहीये. एका टोलनाक्यावर हा प्रसंग घडला आहे. ज्या टोलनाक्यावर तोडफोड झाली. त्या ठिकाणी अमितची गाडी बऱ्याच वेळ उभी होती. त्याच्या कारवर फास्टॅगही होता. तो त्यांना सांगत होता की, मी टोल भरला आहे, तरीदेखील त्याला थांबवून ठेवलं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वॉकीटॉकी सुरू होता. त्यावेळी समोरचा माणूस त्यावरून उद्धटपणे बोलत होता. त्यावर आलेली ही मनसैनिकांची प्रतिक्रिया आहे. अमित महाराष्ट्रभर टोल फोडत सुटलेला नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com