Maharashtra Politics: भाजपचा निवडणूकांचा मेगा प्लॅन, मुंबईत महायुती एकत्र रणांगणात उतरणार

Maharashtra Elections 2025: महाराष्ट्रात लवकरच निवडणूकांची रणधुमाळी सुरु होणारेय. महायुती आणि मविआ म्हणून एकत्र असलेले पक्ष निवडणूकांमध्येही एकत्रच राहणार कि स्वंतत्र लढणार हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता.
BJP, Shinde Sena, and Ajit Pawar’s NCP announce their mega strategy for upcoming Maharashtra local body elections.
BJP, Shinde Sena, and Ajit Pawar’s NCP announce their mega strategy for upcoming Maharashtra local body elections.Saam Tv
Published On

राज्यात लवकरच मिनी विधानसभेच्या निवडणूकांचा बार उडणारेय. होय सुप्रिम कोर्टानं फटकारल्यानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी राज्यभरात सुरु होईल. मात्र राज्यातल्या युती आघाडीच्या राजकारणात, कार्यकर्त्यांच्या निवडणूकीत मोठे पक्ष कसे सामोरे जाणार याचे संकेत आता सत्ताधारी महायुतीनं दिलेत. शिंदे - दादा - फडणवीसांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे मैदान मारण्यासाठी रणनिती आखलीये. नेमका महायुतीनं काय फॉर्म्यूला तयार केलाय.

मुंबई महापालिकेत महायुती म्हणून लढणार

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिंदेंसोबत

ठाण्यात एकनाथ शिंदे स्वंतत्र लढणार

ठाकरे आणि मविआच्या भूमिकेकडे लक्ष

दिवाळीनंतर, म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान राज्यात निवडणूकांचे बार उडणारेत. त्याआधी निवडणुकांमध्ये उतरण्यासाठी भाजपनं कंबर कसलीये. कुठे दादांची घड्याळ बांधून तर कुठे शिंदेच्या धनुष्यबाणाला हातात घेऊन भाजपनं सत्ता राखण्याचा मायक्रो प्लॅन केलाय. पण ठाकरे बंधुना घेरण्यासाठी भाजपनं मुंबईत मात्र दोघांना एकत्र घेऊन निवडणूकांची तयारी केलीये. त्यामुळे आता महायुतीच्या या चक्रव्यूह भेदण्यासाठी ठाकरे बंधू आणि मविआ काय फासे टाकते आणि सत्तेचं सोपान कोणाच्या हाती जातं हे पाहणं महत्वाचं ठरणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com