Bird Flu: राज्यात 'बर्ड फ्लू'ची एन्ट्री; पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत,दीड लाख कोंबड्यांची कत्तल होणार?

Bird Flu Alert in Nandurbar: पोल्ट्री फार्म मालकांची आता पुन्हा एकदा डोकेदुखी वाढलीय. कारण 2010 मध्ये राज्यात आलेल्या बर्ड फ्ल्यूनं नंदुरबारमध्ये पुन्हा थैमान घातलयं. त्यामुळे बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी प्रशासनानं नेमका कोणता निर्णय घेतलाय. पोल्ट्री फॉर्ममध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव नेमका कसा झाला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Bird Flu Alert in Nandurbar:
Poultry farms in Navapur under watch after bird flu scare triggers concern among farmers.saam tv
Published On
Summary
  • नंदुरबारमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव

  • नवापूर भागात पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू

  • दीड लाख कोंबड्यांच्या कत्तलीची शक्यता

रोहित कदम, साम प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्याचं पोल्ट्री हब मानल्या जाणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूने शिरकाव केलाय..त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडालीय. काही दिवसांपूर्वी नंदूरबारच्या नवापूरमध्ये सहा पोल्ट्री फार्ममधील दीडशे ते दोनशे कोंबड्या अचानक मरण पावल्या होत्या. त्यामुळे पोल्ट्री फार्म मालकांनी थेट पशुसंवर्धन विभागात धाव घेतली. त्यानंतर प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी तपास करत संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळमधल्या वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.

त्यानंतर मिळालेल्या अहवालात नवापूर मध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं समोर आलं.आता 1 किलोमीटर परिसरात प्रशासनाकडून पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्यांची कलिंग प्रक्रिया सुरु केलीय..या प्रक्रियेत संसर्ग झालेल्या कोंबड्यांना सामुहिकरित्या नष्ट केलं जाणार आहे. दुसरीकडे बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह येताच जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आलंय. कलिंग प्रक्रियेत सहकार्य न करणाऱ्या पोल्ट्री फार्म संचालकांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

Bird Flu Alert in Nandurbar:
Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

नवापूरसाठी बर्ड फ्ल्यूचं हे संकट नवीन नाही. याआधी नवापूरमध्ये दोनदा बर्ड फ्ल्यूनं थैमान घातलं होतं. 2010 ला राज्यात य़ाचं फ्ल्यूमुळे लाखो कोंबड्यांची कत्तल करण्याची वेळ प्रशासनावर आली होती.. त्यामुळे नवापूरमध्ये वारंवार होणाऱ्या बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडलेत.

Bird Flu Alert in Nandurbar:
शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

एका बाजूला प्रशासन 'कलिंग' करून हा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतंय, तर दुसरीकडे लाखो रुपयांचं भांडवल डोळ्यादेखत मातीत मिसळताना पाहून पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झालेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं आता प्रश्न आहे तो, पोल्ट्री व्यावसायिकांच्या नुकसानभरपाईचा आणि भविष्यातील सुरक्षेचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com