

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत चव्हाट्यावर
सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राची चर्चा
पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख टाळला
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २८ जानेवारीनंतर पक्षाचे कुठलेही पत्रव्यवहार वैध धरू नये, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्यध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला नव्हता. आता या पत्रावरून प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
पक्षाच्या घटनेत अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षालाही अधिकार देण्याच्या प्रस्तावाचा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं समाधान झालं नसल्याची माहिती समोर येत आहे.
मिळेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली होती. या बदलात कार्याध्यक्ष पदाला अधिक अधिकार देण्याचा प्रस्तावाचा समावेश होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी १० मार्च रोजी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र पाठवलं. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख टाळला. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पत्रव्यवहार अमान्य समजून दुर्लक्ष करावे, अशी मागणी आयोगाकडे केली होती.
घटना बदलावरून तटकरे आणि पटेल यांची प्रतिमा नकारात्मक होत असल्याचे समजताच दोन्ही नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईच्या वांद्रे MET संस्थेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घटनेतील बदलांबाबत सुनेत्रा पवार यांना सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे ठरवण्यात आलं.
बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्यापुढे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या स्पष्टीकरणानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ समाधानी नसल्याचे समजतंय.
या संपूर्ण पत्रव्यवहारानंतर आणि बैठकीनंतरही पक्षातील अंतर्गत मतभेद कायम असल्याचे दिसत आहे. त्यात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे लिहिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांना थेट पक्षाच्या कार्याध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.