Amravati: अमरावतीमध्ये खरंच ४ दिवस दारूबंदी? समोर आली महत्वाची अपडेट

Amravati 4 Day liquor Ban Withdrawn: अमरावतीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ दिवसांची दारूबंदी करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. पण आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
Amravati: अमरावतीमध्ये खरंच ४ दिवस दारूबंदी? समोर आली महत्वाची अपडेट
Amravati 4 Day liquor Ban WithdrawnSaam Tv
Published On
  • अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

  • ४ दिवसांची दारूबंदी रद्द केली

  • विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला होता निर्णय

  • बार असोसिएशनच्या विरोधानंतर निर्णय मागे घेण्यात आला

अमर घटारे, अमरावती

अमरावती विधान परिषद निवडणुकीदरम्यान ४ दिवस दारूबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. पण अवघ्या काही तासांमध्ये हे आदेश रद्द करण्यात आले. आता फक्त १८ तारखेला मतदानाच्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत अमरावतीमध्ये दारूबंदी राहणार आहे. अमरावती विधान परिषदेची निवडणूक असल्याने चार दिवस दारूबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले होते. मात्र जिल्हा बार अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी हायकोर्टात जाण्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने दारुबंदीचा निर्णय मागे घेतला आहे.

अमरावतीचे ‘मतदार नगरसेवक हे गुंड किंवा मवाली आहेत काय?’ जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘ड्राय डे’च्या आदेशावर संतप्त सवाल अमरावतीकरांकडून करण्यात आला होता. यासंदर्भात बार अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी हायकोर्टात धाव घेणार असल्याचे सांगितले होते. अवघ्या ४५३ मतदारांसाठी ३० लाख जनतेला वेठीस धरू नका, असे आवाहन नितीन मोहोड यांनी केले होते. अमरावती जिल्ह्यात 18 जून ते 22 जून पर्यंत दारूबंदीचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी या निर्णयाविरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचे सांगितले होते.

Amravati: अमरावतीमध्ये खरंच ४ दिवस दारूबंदी? समोर आली महत्वाची अपडेट
Amravati Case: "मुलींशी हाय हॅलो नको" तर...; अयानला लव्हगुरुच्या टिप्स; आरोपीनं मुलींना कसं अडकवलं जाळ्यात?

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात १८ ते २२ जून असे ४ दिवस दारू विक्रीबंद ठेवण्याचा अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अत्यंत बेजबाबदार, बेकायदेशीर आणि हायकोर्टाच्या निर्देशाविरुद्ध असल्याचा घणाघाती आरोप अमरावती जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी केला आहे. "या निवडणुकीत मतदार असलेले नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी हे काय गुंड किंवा मवाली आहेत का?, ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल?" असा संतप्त सवाल करत मोहोड यांनी या मनमानी आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात (हायकोर्ट) याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Amravati: अमरावतीमध्ये खरंच ४ दिवस दारूबंदी? समोर आली महत्वाची अपडेट
Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा

संपूर्ण अमरावती जिल्ह्यात या निवडणुकीसाठी केवळ ४५३ मतदार आहेत. या मोजक्या मतदारांसाठी जिल्ह्यातील 30 लाख जनतेला कसे गृहीत धरले जाऊ शकते असा सवाल नितीन मोहोड यांनी उपस्थित केला होता. त्यांनी या निर्णयाविरोधात थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिाला होता. या निर्णयानंतर दारूबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला. फक्त १ दिवसच दारूबंदी असणार आहे.

Amravati: अमरावतीमध्ये खरंच ४ दिवस दारूबंदी? समोर आली महत्वाची अपडेट
Amravati News: पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; संतप्त शिवसैनिकांकडून कंपनी कार्यालयाची तोडफोड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com