Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray Deals Major Blow to BJP: सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी मशाल हातात घेतली.
Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
devendra fadnavis And uddhav Thackeraysaam tv
Published On
  • सिंधुदुर्गमध्ये भाजपला मोठा धक्का

  • नितेश राणे मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली

  • नेर्ले गावच्या सरपंचांचा ठाकरे गटात प्रवेश

  • वैभववाडीतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

विनायक वंजारी, सिंधुदुर्ग

कोकणामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपला मोठं खिंडार पडलं. नितेश राणेंच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला. वैभववाडीतील नेर्ले गावचे भाजपचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे कोकणात उद्धव ठाकरेंची ताकद चांगलीच वाढली आहे. हा नितेश राणेंसाठी सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.

वैभववाडी तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला. मंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघातील वैभववाडी नेर्ले गावच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे आणि ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे अन् ठाकरेंना मोठा धक्का, ३ बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'

भगवी शाल घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरेंची साथ सोडत मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते पदाधीकारी भाजपमध्ये प्रवेश करत असताना नितेश राणेंच्याच मतदारसंघात नेर्ले गावच्या सरपंच, उपसरपंचानी ठाकरेंच्या शिवसेनेत केलेला प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रवेशामुळे मंत्री नितेश राणेंना हा मोठा धक्काच मानला जात आहे. या पक्षप्रवेशामध्ये वैभववाडीत ठाकरेंची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशादरम्यान सर्वांनी भाजपबाबत नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी पुन्हा डाव टाकला; सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com