Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सोडलं, शशिकांत शिंदेंच्या हाती धुरा
Jayant Patil Saam tv

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खांदेपालट, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं? या नेत्याचे नाव चर्चेत

Shashikant Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला असून आता शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचे म्हटले जात आहे. शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यपदी निवड करण्यात आली असून येत्या १५ जुलैला म्हणजे मंगळवारी शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे समोर आले आहे.

जयंत पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी करत होते. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापददिनाच्या कार्यक्रमात देखील भाषण करताना त्यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा असे बोलून दाखवले होते. त्यावेळी साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं देखील जयंत पाटील यांनी सांगितले होते.

Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सोडलं, शशिकांत शिंदेंच्या हाती धुरा
Maharashtra Politics: विधानपरिषदेत प्रसाद लाड यांनी थेट बाळसाहेबांची शपथ घेतली, ठाकरेंचे शिलेदार भिडले, नेमकं काय घडलं?VIDEO

'पवारसाहेबांनी मला बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालवधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे.', असे म्हणत त्यांनी शरद पवार यांचे आभार देखील मानले होते. जयंत पाटील यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू होती. अखेर शरद पवार यांनी निर्णय घेतला. जयंत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात असून या पदासाठी साताऱ्याचे आमदार शशिकांत शिंदे यांना संधी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सोडलं, शशिकांत शिंदेंच्या हाती धुरा
Maharashtra Politics: लातूरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ; 'कमळ' घेणार हाती

आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदाची धुरा शशिकांत शिंदे सांभाळणार असल्याचे बोलले जात आहे. १५ जुलै रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक देखील होणार आहे. याच बैठकीत शशिकांत शिंदे प्रदेशाध्यपद स्वीकारणार आहेत. शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आणि मुख्य प्रतोद आहेत. १८ फेब्रुवारी २०२४ पासून जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होते.

Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सोडलं, शशिकांत शिंदेंच्या हाती धुरा
Politics: दोन्ही 'संजय'मुळे एकनाथ शिंदे सापडले चक्रव्यूहात, कडक शब्दात टोचले कान; नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com