Bhusawal News : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! नगरपालिका शाळेत जेवणाच्या साहित्यामध्ये आढळला मृत धनोर किडा

Dead Insect Found In School Meal : भुसावळच्या नगरपालिका शाळेतल्या जेवणात मृत किडा आढळल्याची घटना घडली आहे. भुसावळचे नगरसेवक महिंद्रा ठाकूर यांनी हा किळसवाणा प्रकार उघडकीस आणला आहे.
Dead Insect Found In School Meal
Dead Insect Found In School Meal Saam Tv
Published On

संजय महाजन, साम टीव्ही, प्रतिनिधी

Bhusawal News : भुसावळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भुसावळ शहरातील नगरपालिका शाळेत जेवणात मृत धनोर किडा सापडला आहे. नगरसेवक महिंद्रा ठाकूर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. नगरपालिका शाळेच्या जेवणात किडा सापडल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

भुसावळ शहरातील नगरपालिका शाळा क्र. ३५ मध्ये शालेय पोषण आहारात सोयाबीन पुलाव बनवून विद्यार्थ्यांना खाण्यासाठी दिला जातो. हा पुलाव बनवण्यासाठी पुरविण्यात आलेल्या सोयाबीनच्या वड्यांमध्ये मृत धनोर किडा आढळला. आहार विद्यार्थ्यांना देण्याआधीच हा प्रकार समोर आल्याने अनर्थ टळला असे लोक म्हणत आहेत.

नगरपालिका शाळेतला हा प्रकार भुसावळ शहरातील नगरसेवक महिंद्रा ठाकूर यांनी उघडकीस आणला. त्यांनी पोषण आहार पुरवठा अधिकारी यांच्यासह भुसावळ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे संबंधित प्रकारावरुन तक्रार नोंदवली आहे. ठाकूर यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.

Dead Insect Found In School Meal
Sambhaji Nagar News : साडी नेसली, डोक्यावर कळशी घेतली; पाणी प्रश्नासाठी सरपंचाचं आगळंवेगळं आंदोलन, VIDEO

नगरपालिका शाळा क्र. ३५ मध्ये सदर पोषण आहार हा लोकशाही महिला गृह उद्योग संचलित केंद्रीय स्वयंपाक गृहप्रणालीच्या मार्फत पुरवण्यात येतो. तेव्हा तपास करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून होत आहे. जेवणाच्या साहित्यामध्ये किडा सापडल्याने शाळेत खळबळ उडाली आहे.

Dead Insect Found In School Meal
Agriculture Minister: कर्जमाफ होईल म्हणून शेतकरी कर्ज भरत नाहीत; कर्ज बुडवणाऱ्यांचे कृषीमंत्र्यांनी टोचले कान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com