Agriculture Minister: कर्जमाफ होईल म्हणून शेतकरी कर्ज भरत नाहीत; कर्ज बुडवणाऱ्यांचे कृषीमंत्र्यांनी टोचले कान

Agriculture Minister On Farmer Loan: शेतकरी आहेत त्यांना बँकांकडून कर्ज मिळाली आहेत. कमी व्याजदरात कर्ज मिळावे यासाठी आरबीआय आणि नाबार्डशी चर्चा करणार असल्याचं कृषीमंत्री म्हणालेत.
Agriculture Ministe
Agriculture Minister On Farmer Loan Google
Published On

शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरात कर्ज पुरवले जाते, त्या कर्जाचे व्याजदर अजून कमी, व्हावेत यासाठी कृषीमंत्री प्रयत्न करणार आहेत. मात्र त्याचबरोबर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्ज बुडवणाऱ्या शेतकऱ्यांची कान उघडणी केलीय. सरकार कर्जमाफ करेल म्हणून अनेकजण कर्जाची परतफेड करत नाहीत, हा चुकीचा पायंडा असल्याचं कृषीमंत्री म्हणालेत. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना त्यांनी कर्ज बुडवणाऱ्यांना सुनावलं.

शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळावे, यासाठी नाबार्ड आणि RBI सोबत चर्चा करावी लागेल, असं राज्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणालेत. यावेळी बोलताना कृषीमंत्र्यांनी शेती करण्याच्या पद्धतीवर चिंता व्यक्त केली. रासायनयुक्त भाजीपाल्यामुळे कॅन्सरसारखी घातक आजार माणसांना जडत असतात. त्यावरून बोलतांना कोकाटे म्हणाले, सध्या रासायनिक शेती वाढतेय. त्याचा आरोग्यास धोका आहे, लोकांच्या आरोग्याला त्रास होतो.

रासायनिक शेतीमुळे कॅन्सरसारखे आजार जडतात. रासायनिक शेतीचा तोटा आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दिसतो. त्यामुळे चांगलं अन्न पिकवावे आणि खावे असं कृषीमंत्री कोकाटे म्हणालेत.

सर्वसामान्य नागरिकांसाठी फायद्याचं बजेट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत बजेट सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. हा बजेट सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणालेत.

Agriculture Ministe
Budget 2025: क्रेडिट कार्डवरून मिळणार ₹30,000 पर्यंत कर्ज; अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

सकारात्मक बजेट आहे. तृणधान्य आणि कडधान्यसाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. तुरीचे नवीन वाण आले आहेत. २७ टक्के महाराष्ट्र बागायतदार, ७० टक्के जिरायत जमीन आहे. शेती क्षेत्रात काम करावे लागणार आहे. चांगलं पिकवणे आणि खाणे महत्वाचे आहे. काही अंशी संशोधन झाली आहे पण वेग कमी आहे. नवीन बियाणे आणून प्रगती केली आहे, प्रयोग केला आहे तो चांगला आहे. आम्ही कमी खर्चात जास्त संशोधन करू, असं कृषीमंत्री म्हणालेत.

Agriculture Ministe
Budget 2025: इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणं झालं स्वस्त; EV बॅटरीसंदर्भातही सरकारची मोठी घोषणा

शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळावे यासाठी, नाबार्ड आणि RBI सोबत चर्चा करावी, लागणार असल्याचं कोकाटे म्हणालेत. शेतकरी आहेत, त्यांना कर्ज मिळाले आहे. अजित पवार यांनी शेतकरी कर्जासाठी बँकांना सुचना दिल्यात. कर्जदार आणि ठेवीदार यांना रिलीफ देण्याचा विचार असल्याचंही कृषीमंत्री कोकाटे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com