भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी; एकमेकांवर दगडफेक

BJP Congress Workers Clash In Bhiwandi: भिवंडी महापालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. वॉर्ड २० मध्ये घोषणाबाजीवरून वाद वाढून दगडफेकीपर्यंत प्रकार गेला.
BJP Congress workers clash in Bhiwandi civic elections
BJP Congress workers clash in Bhiwandi civic electionsSaam Tv
Published On

राज्यामध्ये 29 महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. या महापालिका निवडणुकीत कोण कोणाच्या विरोधात लढत आहे. हेच कळायला मार्ग नाही अशी भावना सामान्य नागरिक विचारत आहे. कुठे महायुती म्हणून शिंदे, फडणवीस आणि आजितदादा हे एकत्र लढत आहे तर कुठे एकमेकांच्या विरोधात लढत वाभाडे काढत आहे.

BJP Congress workers clash in Bhiwandi civic elections
रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा वादात; PMPL बसमधील रीलमुळे नोटीस

यंदाची निवडणुकीत पहिल्यांदाच तिकीट मिळण्यावरून राडा, अर्ज भरताना ते माघारी घेताना झालेली हाणामारी तर सोलापूरमध्ये मनसे पदाधिकाऱ्याचा खून केला. हा सर्व भयावह प्रकार जनेतेने कधी ही न बघितलेला आहे.

BJP Congress workers clash in Bhiwandi civic elections
विरोधक राहिले बाजूला! भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत पेटली वादाची ठिणगी

अशातच भिवंडीमध्ये देखील आज भाजप आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून नारपोली येथील भंडारी चौक परिसरात दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

BJP Congress workers clash in Bhiwandi civic elections
आम्ही बोललो तर तुमची अडचण होईल, Ravindra Chavan यांचा Ajit Pawar यांना इशारा

वॉर्ड क्रमांक २० मध्ये भाजप उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांची कार्यालये रस्त्याच्या समोरासमोर आहेत. सायंकाळच्या सुमारास काँग्रेस उमेदवारांनी रॅली काढत भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. याच घोषणाबाजीवरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

हा वाद पुढे हिंसक वळण घेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दगडफेक आणि काठ्यांचा मारा करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com