

Bhiwandi Car Crash News: भिवंडीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बेजबाबदार कार चालकाने मोबाईलवर व्हिडीओ पाहण्याच्या धुंदीत कार रिव्हर्स घेतली. त्याचवेळी एक ४ वर्षीय चिमुकली कारच्या मागच्या चाकाखाली आली. काही कळण्याच्या आतच कारने चिमुकलीला चिरडलं, अंगावर काटा आणणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अलिना (वय ४ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचं नाव आहे. याप्रकरणी अलिनाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सद्दाम असं कारचालकाचं नाव असून तो अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
५ जून रोजी भिवंडी शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी असलेल्या बागे युसूफ या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर निकाह सभारंभ होता. या समारंभासाठी पाहुण्यांची वर्दळ होती. दरम्यान, याचवेळी एका अलिशान कारमधून एक कुटुंब उतरले. त्यानंतर चालक कार घेऊन पार्किंगमध्ये उभी करण्यासाठी जात होता.
त्यावेळी त्याने कारच्या काचा लावून व्हिडीओ पाहतच कार रिव्हर्समध्ये घेतली. तो व्हिडीओ पाहण्यात गुंग असल्याने त्याचे लक्ष कारमागे खेळणाऱ्या मुलांवर नव्हते. अशातच अलिना कारच्या मागे खेळण्यात मग्न होती. त्याच वेळी अचानक चालकाने कार रिव्हर्स घेतली आणि अलिनाला जोरदार धडक दिल्याने ती फॉर्च्यूनर कारच्या मागील चाकाखाली येऊन ती चिरडली गेली.
धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी हा कारचालक कार मागे घेत होता. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिक चालकाला जोरजोरात आवाज देऊन कार थांबविण्यास सांगत होते. मात्र कार चालकाने कार थांबवली नाही आणि चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात कार चालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा तपास सुरू केला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.