Bhandara: कॅन्सरला कंटाळून महिलेची गोसे धरणात उडी घेत आत्महत्या

कॅन्सरला त्रासून एका 50 वर्षीय महिलेने गोसे धरणात उडी घेत आत्महत्या केल्याची दु:खद घटना घडलीये.
Bhandara woman suicide
Bhandara woman suicidesaam tv
Published On

भंडारा: कॅन्सरला त्रासून एका 50 वर्षीय महिलेने गोसे धरणात उडी घेत आत्महत्या केल्याची दु:खद घटना घडलीये. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसिखुर्द धरण परिसरात घडली आहे. सिंधु काशीनाथ गायमुखे (वय 50) असे मृतक महिलेचे नाव आहे (Bhandara Woman Commit Suicide Due To Cancer).

Bhandara woman suicide
Beed: हत्या की आत्महत्या? सोलापूरच्या डोनज गावात ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू

सिंधु गायमुळे या गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरने (Cancer) ग्रस्त होत्या. दोन वर्षांपूर्वी पती मरण पावल्याने घरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यात कॅन्सर आजाराच्या उपचारसाठी पुरेसे पैसेही नव्हते. गंभीर परिस्थिती असल्याने उपचार होऊ शकत नव्हता.

त्यामुळे परिस्थितीला कंटाळून कॅन्सरने त्रस्त असलेल्या सिंधू गायमुखे यांनी आत्महत्येचं मोठं पाऊल निवडल्याचे बोलले जात आहे. सिंधु यांच्या आत्महत्येने गावात शोककळा पसरली आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com