Beed: हत्या की आत्महत्या? सोलापूरच्या डोनज गावात ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू

मुलाचा खून झालाय, तिथं आमची साधी तक्रारही घेतली नाही, ऊसतोड मजुर दाम्पत्यांचा आरोप
Beed: हत्या की आत्महत्या? सोलापूरच्या डोनज गावात ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू
Beed: हत्या की आत्महत्या? सोलापूरच्या डोनज गावात ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यूविनोद जिरे
Published On

बीड: बीड जिल्हा आणि ऊसतोड कामगार, अशी जणू काही नाळचं गेल्या अनेक वर्षांपासून जुळली आहे. जिल्ह्यात (district) जवळपास साडेपाच लाख ऊसतोड कामगार मजूर आहेत. तर याच ऊसतोड मजुरांच्या जीवावर पोळ्या भाजणारे, शेकडो ऊसतोड कामगार नेते आणि कार्यकर्ते आहेत. मात्र, ढिगभर ऊसतोड कामगार असणाऱ्या या बीड (Beed) जिल्ह्यात, एका ऊसतोड मजूर दांपत्याला, आपल्या मुलाच्या न्यायासाठी (Justice) वणवण भटकंती करावी लागत आहे. बीडच्या शिरूर कासार (Shirur Kasar) तालुक्यात असणाऱ्या, जाटनांदुर येथील ऊसतोड मजूर, सोमनाथ त्रिंबक वाल्हेकर परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने, ते गेल्या अनेक वर्षांपासून पत्नीसह (wife) ऊसतोडीला जातात. (Suspected death sugarcane worker Donaj village Solapur)

यावर्षी देखील वाल्हेकर दाम्पत्य, आपला लहान मुलगा सुरज याच्यासह सोलापूर (Solapur) जिल्ह्यतील मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यात असणाऱ्या डोनज येथील, युटोपीन साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी गेले होते. मात्र, अचानक ऊसतोड मजुराची कमतरता भासल्याने, बीड जिल्हा रूग्णालयात कोविड कालावधीत ब्रदर म्हणून काम केलेल्या, 23 वर्षीय आकाश या आपल्या दुसऱ्या मुलाला बोलावले होते. यादरम्यान आकाश अचानक आजारी पडल्याने भाऊ सुरज याने 27 जानेवारी दिवशी डोणज गावातील, डाॅ.गुगडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

हे देखील पहा-

यावेळी पैसे आणण्यासाठी सूरज हा परत कोपीवर गेला होता. मात्र 3-4 तासानंतर सूरज परत आल्यावर आकाश दवाखान्यात दिसून आला नाही. तर त्याचे प्रेत हॉस्पिटल (Hospital) पासून जवळपास पाऊण किलोमीटर अंतरावरील कॅनालजवळ अर्धनग्न अवस्थेत आढळुन आले होते. यादरम्यान त्याच्या घुडघ्यावर, अंगावर मारहाणीच्या खुणा दिसुन येत होते. गळ्याभोवती रूमाल आवळलेला होता. नाकातोंडात माती होती, तर मुठी देखील आवळलेल्या अवस्थेत आढळुन आले होते.

याविषयी डाॅ.गुगडेंना विचारणा केली असता उडवा- उडवीची उत्तरे दिली तर पोलीस अधिकारी माने यांनी साधी तक्रार देखील घेतली नाही. अशी प्रतिक्रिया मयत आकाश वाल्हेकर याचा भाऊ तरुण ऊसतोड मजूर सूरज याने दिली होती. याविषयी सोमनाथ वाल्हेकर म्हणाले, की आमचे काहीच म्हणणे ऐकुन न घेताच धडधडीत दिवसा खुन झाल्याचे दिसत असतानाही, आत्महत्या केली असेल असे म्हणतात. माझ्या पत्नीलाही दबाव टाकून धमकी देण्यात आली. माझा मुलगा आत्महत्या का करेल? त्याचा खूनचं केला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी मयत आकाशचे वडील करत आहेत. याविषयी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, की बीड जिल्हा रुग्णालयमध्ये कोरोना काळामध्ये ४ महिने ब्रदर म्हणून काम करणाऱ्या आकाशचा, सोलापूर जिल्ह्यामध्ये खून झाला आहे.

Beed: हत्या की आत्महत्या? सोलापूरच्या डोनज गावात ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू
MHADA Exam | डमी उमेदवार बसवणाऱ्या आरोपी परीक्षार्थीच्या बीड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मात्र, याची दाखल कोणीच घेत नाहीत. मयत आकाशचा भाऊ सुरज हा आमदार सुरेश धस यांच्याकडे गेला होता, तर गावातील व्यक्तीने खासदार प्रीतम मुंडे यांना फोनवरून माहिती दिली होती. मात्र अद्यापही काहीच झाले नाही. त्यामुळे गेल्या 13 दिवसांपासून हे कुटुंब वणवण भटकत आहे. मात्र, बीड जिल्ह्यात ढीगभर नेते असताना या कुटुंबाला न्याय देत नाही, केवळ याठिकाणी ऊसतोड मजुरांचा मतदाना पुरता वापर केला जात आहे. माझी त्यांना एकच विनंती आहे, की ऊसतोड मजुराच्या नेत्यांनी या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा आम्ही सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करू, असा इशारा गणेश ढवळे यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यात ढीगभर ऊसतोड मजुरांचे आहेत.

अनेक जन हातात कोयते घेऊन राजकीय फायद्यासाठी ऊसतोड मजुरांचे मेळावे घेतात. आपणच त्यांचे तारणहार असल्याचा दावा करतात. मात्र, एका ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यु होऊनही साधं कोणी न्याय देखील काढत नाही. त्यामुळे न्यायाची मागणी घेऊन या ऊसतोड मजूर असणाऱ्या वाल्हेकर दांपत्याला दारोदार वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यांनी आता जिल्हाधिकारी बीड यांना लेखी तक्रार केली. त्यामुळे आतातरी ऊसतोड कामगार नेते असणाऱ्या मधील कुणाला जाग येणार का? आणि वाल्हेकर दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यासाठी कुणी पुढं येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com