Scorching Summer In Bhandara : भंडारा जिल्ह्यात तापमानात वाढ, घराबाहेर पडताना अशी घ्या काळजी

भंडाऱ्यात 41 अंशाचा तापमान नोंदवण्यात आले आहे. आज तापमानाने 41.8 अंशाचा टप्पा गाठला. रस्त्यावरील नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य होत आहेत.
bhandara recorded 41 degree celsius temperature
bhandara recorded 41 degree celsius temperaturesaam tv

- शुभम देशमुख / गाेपाल माेटघरे

Bhandara :

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यात तापमानाचा पार वाढण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. भंडारा जिल्ह्यासह शहरात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सध्या भंडाराचा पारा 41 अंशापुढे गेला आहे. (Maharashtra News)

राज्याच अनेक ठिकाणी तापमानाने 40 अंशाचा टप्पा गाठला आहे. तर भंडाऱ्यात 41 अंशाचा तापमान नोंदवण्यात आले आहे. आज तापमानाने 41.8 अंशाचा टप्पा गाठला. रस्त्यावरील नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य होत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उन्हाच्या झळांची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांनी गॉगल, टोपी, छत्री आदींचा वापर करावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी करताना दिसत आहेत. कडक उन्हामुळे बुहतांश नागरिक दुपारच्यावेळी घराबाहेर न पडणेच पसंत करताना दिसत आहे. सायंकाळच्या सुमारास नागरिकांची थाेडी फार वर्दळ बाजारपेठेत असते.

bhandara recorded 41 degree celsius temperature
Vanchit Bahujan Aghadi : परभणी लाेकसभा मतदारसंघातून 'वंचित'नं नाकारलं, आलमगीर खान यांचा नेत्यांवर आराेप

आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात धुराचे लाेट

पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी भागात मोकळ्या मैदानावरील गवताला आज (बुधवार) अचानक दुपारी वनवा पेटल्यासारखी आग लागली आहे. गंगानगर ते आकुर्डी रेल्वे स्टेशन रोडच्या बाजूला असलेल्या मैदानावरील गवताला आग झाली.

आगीच्या धुरामुळे आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरा जवळ मोठ्या प्रमाणात धुराचे लाेट निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

bhandara recorded 41 degree celsius temperature
प्रतापसिंहनगर : साताऱ्यात गुंडाच्या घरावर चालवला बुलडाेझर, 16 घरे प्रशासनाच्या रडारावर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com