Snake Bite : रात्री झोपेतच सर्पदंश; सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू
शुभम देशमुख
भंडारा : रात्री कुटुंब घरात झोपलेले असतांना मुलीच्या अंगावरून साप गेला. यामुळे जागे झालेल्या मुलीला सर्पाने दंश (Snake Bite) केला. यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र विषारी मण्यार जातीचा (Bhandara) साप असल्याने विष संपूर्ण शरीरात पसरल्याने मुलीचा उपचार सुरु होण्यापूर्वीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नवरगाव येथील मोनाली गुर्वे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. गूर्वे कुटुंब रात्री घरात झोपले असताना मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मोनाली ही उठून बसली. तिला काहितरी रुतल्यासारखे वाटले. यामुळे तिने आई वडिलांना उठविले. यानंतर लाईट सुरू करुन पाहिल्यावर भला मोठा साप दिसून आला. मण्यार जातीचा सापाने मोनाली गुर्वे हिला दंश केला होता.
उपचारापूर्वीच मृत्यू
मोनाली हिला रात्रीच तुमसर येथिल रुग्णालयात हलविण्यात आले. पण हा साप विषारी असल्याने संपुर्ण विष मोनालीच्या शरीरात पसरल्याने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. मोनाली ही गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीच्या वर्गात शिक्षणं घेत होती. मोनालीच्या मृत्यूमुळे गुर्वे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.