भंडाऱ्यात विजेचा तांडव! 3 ठिकाणी वीज कोसळून 2 ठार, 2 गंभीर

Bhandara Lightning Strike Deaths Injuries Tumsar Pawani: भंडारा जिल्ह्यात विजेचा कहर! तुमसर आणि पवनी तालुक्यात तीन ठिकाणी वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी. शेतात काम करताना घडली दुर्घटना.
Lightning strike in Bhandara district claims two lives while farmers were working in fields during heavy rainfall.
Lightning strike in Bhandara district claims two lives while farmers were working in fields during heavy rainfall.saam tv
Published On

भंडारा जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली. या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी शेतात काम करत असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तुमसर तालुक्यातील चारगाव-ढोरवाडा शेतशिवारात वीज कोसळल्याने शरद बुधे (वय ४५) यांचा मृत्यू झाला. ते आपल्या मेहुण्यासोबत शेतात काम करत होते. या घटनेत महेश फेंडर (वय ३५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Lightning strike in Bhandara district claims two lives while farmers were working in fields during heavy rainfall.
MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

तसेच खापा येथे वीज कोसळल्याने तुकडू चौधरी (वय ७०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, तिसरी घटना पवनी तालुक्यातील ब्रम्ही येथे घडली. शेतात काम करत असताना श्रीकांत घावडे (वय ३९) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Lightning strike in Bhandara district claims two lives while farmers were working in fields during heavy rainfall.
Maharashtra Politics: शरद पवार अन् काँग्रेसला मोठा धक्का; 15 बडे नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार; राज्यात टायगर एक्स्प्रेस सुसाट

या तिन्ही घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मागील १२ दिवसांत तुमसर तालुक्यात चार वेळा वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून यामध्ये एका महिलेचा आणि तब्बल २५ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com