कृषीमंत्री कदमांच्या आदेशानंतर घाेटाळेबाजांचे धाबे दणाणले

food grains
food grains

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील धान food grains, तांदूळ घोटाळ्याबाबत विरोधकांकडून सतत महाविकास आघाडी सरकारवर आरोप होत असताना भंडारा जिल्ह्यात साकोली येथे तेलंगाना येथील व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून २२ लाख ५० हजाराच्या लूटी प्रकरणानंतर जिल्ह्यात तांदूळ घोटाळा होत असल्याची चर्चा पुन्हा रंगली. आता ह्या दृष्टिने चौकशी करण्याचे आदेश खुद्द महाविकास आघाडीचे कृषीराज्य मंत्रि तथा भंडाऱ्याचे पालकमंत्रि विश्वजीत कदम vishwajeet kadam यांनी दिले आहेत.

पूर्व विदर्भातील जिल्ह्यात तांदूळ घोटाळा झाल्याचा आराेप सातत्याने भाजपकडून केला जात आहे. विशेषत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. या प्रकाराची सीआयडी मार्फत चौकशी सुरु आहे.

दरम्यान ही चौकशी केवळ कागदोपत्री सुरु असल्याचे मत राजकीय विश्लेषकांचे आहे. त्यांच्या म्हणण्यानूसार केवळ कागद रंगविली जात आहेत दुसरं काही नाही. राजकीय विश्लेषक चेतन भैरम म्हणाले सतत धान घोटाळा, तांदूळ घोटाळा बाबत जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगली असताना तेलगांना येथील धान व्यापाऱ्याचे साकोली येथे २२ लाख ५० हजार लुटल्याचे प्रकरण घडकीस आले. पोलिसांनी तत्परता दाखवून २४ तासात संशयितांना पकडले. संबंधित रक्कम ताब्यात घेण्यात आली. मात्र ही रक्कम धान विक्रीतुन मिळाल्याचे स्पष्ट झाल्यावर जिल्ह्यात धानाच्या व्यवहारात करोड़ो रूपयांची उलढाल असल्याचे सिद्ध झाले आहे.

आता विरोधक करत असलेल्या धान घोटाळाबाबत भंडारा जिल्ह्याच्या तर संबंध नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. पालकमंत्री विश्वजित कदम यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश भंडारा पोलिसांना दिले आहेत. जर काेणी या प्रकरणी दाेषी आढळल्यास त्याच्यावर शंभर टक्के कठाेर कारवाई केली जाईल असे आश्नासन मंत्रि विश्वजीत कदम यांनी दिले. त्यामुळे काहींचे दाबे दणाणले आहेत तर अनेक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

food grains
रंगकर्मींच्या आंदाेलनात अभिजित बिचुकले म्हणाले, उद्धव ठाकरे...

याबाबत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले म्हणाले राजकीय व्यवस्थेत अनेक व्यापारी प्रवृत्तीचे लाेक आलेत. त्याचे परिणाम शेतक-यांच्या धानावर देखील दिसून येत आहे. या प्रकरणाची सखाेल चाैकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली हाेती. आता चाैकशी हाेईल आणि सत्य बाहेर येईल.

एकंदरित जिल्ह्यात झालेल्या धान व्यापारी लूटमार प्रकरणाने नवीन वळण घेतले असून खुद्द पालकमंत्र्यानी संपुर्ण प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश दिल्याने अनेकांचे दाबे दणाणले आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com