रंगकर्मींच्या आंदाेलनात अभिजित बिचुकले म्हणाले, उद्धव ठाकरे...

abhijeet bichukale
abhijeet bichukale
Published On

सांगली : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज (साेमवार) रंगकर्मींच्या वतीने सांगलीत मूक आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनात जिल्ह्यातील रंगकर्मी सहभागी झाले होते. यावेळी रंगकर्मींनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास दिले.

गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीत रंगकर्मी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काहींनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला. परंतु सरकारने कलाकारांकडे पाठ फिरवली आहे. यामुळे रंगकर्मी आक्रमक झाले आहेत. आज राज्यभर रंगकर्मींचे आंदाेलन सुरु आहे.

नियम व अटींचे पालन करत रंगकर्मींना कला सादर करण्यास शासनाने परवानगी द्यावी. स्थानिक कलाकारांना प्रवासाची परवानगी द्यावी. अनेक महिन्यांपासून उत्पन्न नसल्याने घरभाडे, वीजेचे बिल माफ करण्यात यावे. रंगकर्मींच्या मुलांना फी भरली नसल्याने शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार काही ठिकाणी घडला आहे. शासनाने तात्काळ या मुलांचा प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्या रंगकर्मींनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

राजकीय नेत्यांचे कार्यक्रम रंगमंचावर होतात मग आम्हा कलाकारांना का बंदी असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही स्वतः फोटोग्राफर आहात. तुम्ही कलाकाराच्या व्यथा जाणून आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असे मत मराठी बिगबाॅस फेम अभिजित बिचुकले abhijeet bichukale यांनी व्यक्त केले.

दरम्यान आज महाकाली संघटनेतर्फे देवदासी आणि तृतीयपंथी यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि कृषिमंत्रि विश्वजित कदम यांना दिले. यावेळी मंत्रि कदम यांनी जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन संघटनेस दिले.       

abhijeet bichukale
सरकार विराेधात ४९ गावांतील ग्रामस्थ एकटवले; माेर्चाचा निर्धार

आम्हांला पेन्शन, घरकुल अशा शासनाच्या अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने आमचा समाजाचा विचार करुन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केल्याचे तृतीयपंथींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com