काेल्हापूर : जिल्ह्यातील महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातील ४९ गावांतील ग्रामस्थ विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुक्यात मोर्चा काढणार आहेत. पुररेषेच्या आत येणाऱ्या शेतीला १०० टक्के भरपाई मिळावी, उसाची भरपाई सरसकट दाेन हजार रुपये प्रति गुंठा मिळावी, जनावरांना चारा मिळावा. भूमीहिन शेतकऱ्यांना पाच लाख रुपये विना व्याज कर्ज मिळावे आदी मागण्यांसाठी हा माेर्चा असणार आहे.
अतिवृष्टी आणि महापुराने काेल्हापूर जिल्ह्यात हजाराे हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. या भागात काेट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या डाेळ्यासमाेर शेती उद्धवस्त झाली आहे. शिराेळ तालुक्यात अंदाजे २० हजार २६० हेक्टरवरील विविध पिके पुराच्या पाण्यात खराब झालेली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.
राज्य शासनाने आमचा तालुका शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर करावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे. याबराेबरच शिराेळ तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी देखील मागणी असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. दरम्यान तालुक्यात शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समिती स्थापित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावा गावात पाहणी करुन शेतक-यांच्या व्यथा समजून घेतल्या जात आहे. याबराेबरच एक माेठा मोर्चा काढण्याचे नियाेजन केले जात आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.