

बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरात लव्ह जिहादच्या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट
अल्पवयीन मुलीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याचे उघड
आरोपी रहमत याच्यावर माजलगाव येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश काशिद, साम टीव्ही
अमरावतीचं अयान प्रकरण ताजं असताना बीड जिल्ह्याच्या माजलगाव शहरातूनही खळबळजनक घटना घडल्याचे समोर आलंय. लव्ह जिहादच्या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. माजलगांव शहरातील कॅफेमधे 21 एप्रिल रोजी एका मुलीवर अतिप्रसंग करताना एका युवकाला हिंदू तरुणांनी पकडले. त्याची चौकशी केली असता लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर मुलावर गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलीच्या आईने माजलगाव येथील शहर पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर आरोपीविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगांव शहरात ग्रामीण भागातील अनेक मुली शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात. पीडित मुलगी ग्रामीण भागातील असून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. मुलीचे आई वडील मजुरी करतात. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पीडित मुलीच्या मैत्रिणीने आरोपीसोबत ओळख करुन दिली.
दोघांची एकमेकांना शैक्षणिक साहित्याची देवाण घेवाण करण्याच्या माध्यमातून मैत्री झाली. या ओळखीतून मुलीला एका कॅफेमधे बोलावून घेतले. संबंधित मुलगी कॅफेमधे गेल्यानंतर तिची मैत्रीण भेटली नाही. परंतु तिथे आरोपी रहमत अलीम शेख आधीच बसला होता.
मैत्रीण येईपर्यंत पीडित मुलगी तरुणासोबत गप्पा मारत बसली होती. मात्र त्या आरोपीने पीडित मुलीला पकडून तिच्यासोबत अतिप्रसंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे. कॅफेतील काही तरुणांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यानंतर त्यांनी मुलाच्या तावडीतून पीडित मुलीला सोडवून पोलिसांना कळवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच माजलगाव येथील शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्या आरोपी मुलास ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपी रहमत असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 74,75,79 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 8,12, 126 (2) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास संबंधित पोलिस करत असल्याचे सांगण्यात आले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.