पहिलीच डिलिव्हरी होती अन् बाळाला कडेवर घ्यायच्या वयात...; बीडमधील 'त्या' घटनेने महाराष्ट्र सुन्न

Beed woman medical negligence after C-section surgery : बीड जिल्हा रुग्णालयात सिझरनंतर महिलेच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप आहे. गंभीर संसर्गानंतर महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून कुटुंबीयांनी दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.
Beed woman medical negligence after C-section surgery
Beed woman medical negligence after C-section surgerySaam TV
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Beed medical negligence : बीड जिल्हा रुग्णालयात सिझरच्या (प्रसुती) शस्त्रक्रियेनंतर एका महिलेच्या पोटात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोटात तीव्र त्रास सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी संध्या गायकवाड या पीडित महिलेला बीडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे उपचारासाठी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांना खाजगी रुग्णालयांत पाठवून मोठे 'सिंडिकेट' चालवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Beed woman medical negligence after C-section surgery
ठाकरेंना रामराम ठोकण्याच्या तयारीत! त्या १० नगरसेवकांचा 'मास्टरस्ट्रोक'; काय घडतंय राजकीय वर्तुळात?

सध्या पीडित महिलेवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असून ती आयसीयूमध्ये (ICU) मृत्युशी झुंज देत आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील हातमोजे आणि कागदी रुमाल बाहेर काढले; मात्र या गंभीर संसर्गामुळे तिचे गर्भाशय देखील काढावे लागल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

Beed woman medical negligence after C-section surgery
रिक्षावाल्या भैयाची आजपासून परीक्षा! मराठी आलीच पाहिजे, नाहीतर परवाना कायमचा विसरा; काय आहेत नवे नियम

"माझी मुलगी पहिल्यांदाच आई झाली आहे, पण आज ती स्वतःच्या बाळाला जवळ घेऊ शकत नाही. तिच्यावर ही वेळ आणणाऱ्या दोषी डॉक्टरांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करा," अशी मागणी करत पीडित महिलेच्या आईने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आता या निष्काळजी डॉक्टरांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com