Beed Crime: तू नाही आलास तर मला..., सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Beed Police: बीडमध्ये एका व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. व्यापाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे सावकारासोबत नेमकं काय बोलणं झालं होतं याच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत.
Beed Crime: तू नाही आलास तर मला..., सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
Beed CrimeSaam Tv
Published On

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये सावकाराच्या जाचास कंटाळून व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. कापड व्यापाऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली होती. या व्यापाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे सावकारासोबत फोनवर नेमकं काय बोलणं झालं होतं याचा ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये सावकार या व्यापाऱ्याला धमकी देताना ऐकायला मिळत आहे.

बीड शहरातील पेठ बीड भागातील कापड व्यापारी राम फटाले यांनी सावकाराच्या जाचास कंटाळून काही दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींना १० जुलैपर्यंतची पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे.

Beed Crime: तू नाही आलास तर मला..., सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
Beed Crime: 'तू माझ्याशी बोलली नाही तर...', रस्ता अडवत शाळकरी मुलीचा विनयभंग, कुटुंबीयांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि राम फटाले यांच्या संभाषणाच्या दोन अतिशय धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या आहेत. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव हा फटाले यांना अरेरावीची भाषा करत शिवीगाळ करत आहे. 'तू माझ्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या वडिलांना घेऊन ये. तसेच माझी मुद्दल मला दे. कधी देतोस ते सांग? तू नाही आलास तर मला तुझ्या घरी पोरं घेऊन यावं लागेल.', अशा प्रकारे सावकार व्यापाऱ्याला धमकावत असल्याचे ऐकू येत आहे.

Beed Crime: तू नाही आलास तर मला..., सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
Beed : ऑनलाइन जुगारात पैसे बुडवले, कर्ज फेडण्यासाठी पोलीस बनला चोर; पोलीस अधीक्षक कार्यालयात केली होती चोरी

तर व्हायरल झालेल्या दुसऱ्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये २००० रूपये टाकले वरचे ४०० रुपये तुझा बाप टाकणार आहे का? अशा प्रकारची भाषा सावकार लक्ष्मण जाधव वापरत असल्याचे या कॉल रेकॉर्डिंगमधून समोर आलं आहे. तर तुला पैसे देणं होत नसेल तर तुझी बायको माझ्या घरी आणून सोड अशा प्रकारची भाषा वापरल्याचा देखील फिर्यादीमध्ये उल्लेख आहे.

या आणि अशाच प्रकारच्या सावकाराकडून होत असलेल्या जाचाला कंटाळूनच राम फटालेंनी आत्महत्या केल्याचे आता स्पष्ट होत आहे. यामुळे बीड शहरातील हे प्रकरण अतिशय गंभीर बनलं असून सावकारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमध्ये एकामागे एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Beed Crime: तू नाही आलास तर मला..., सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
Beed: माजी नगरध्यक्षाने पत्नीसाठी सख्ख्या बहिणीला फसवलं; खोट्या सह्या करून प्लॅट ताब्यात घेतला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com