Beed : ऑनलाइन जुगारात पैसे बुडवले, कर्ज फेडण्यासाठी पोलीस बनला चोर; पोलीस अधीक्षक कार्यालयात केली होती चोरी

Beed Shocking : बीडमध्ये एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याने सुरुवातीला पोलीस अधीक्षक कार्यालयात चोरी केली होती. आताही त्याने साथीदारांसह सात दुचाकी चोरल्या आहेत.
Beed Shocking
Beed ShockingSaam Tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने चोर बनून चोरी केल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन बेटिंग ॲपमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने त्याचे पैसे बुडवले. पैसे मिळवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच चोरी केली होती. चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात ५८ बॅटऱ्यांची चोरी केली होती. २०२४ मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने इन्वर्टरसाठी लागणाऱ्या बॅटऱ्या चोरल्या होत्या, त्याची चोरी पकडली गेली होती. त्याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ड्रीम ११, रमी ॲपमध्ये त्याने पैसे बुडवले होते. ऑनलाइन जुगारासाठी त्याने लोकांकडून कर्ज घेतले होते. लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी केली.

Beed Shocking
Umpire Death : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट अंपायरचे ४१ व्या वर्षी निधन, जय शाह यांनी वाहिली श्रद्धांजली

बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील इन्वर्टरच्या बॅटऱ्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चोरल्या होत्या. २०२४ मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला वर्ष उलटत नाही. तोच पोलीस उपनिरीक्षकाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याने दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली.

Beed Shocking
Mumbai Local : गर्दी टाळण्यासाठी कामाची वेळ बदला, ८०० कार्यालयांना शिफ्ट बदलण्याचे मध्य रेल्वेने केले आवाहन

अमित मधुकर सुतार हा बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. अमितने गेल्या वर्षी पोलीस अधीक्षक कार्यालयात चोरी केली होती. या प्रकरणात तो पकडलाही गेला होता. त्यानंतर अमितने पुन्हा एकदा कारनामा केला आहे. त्याने साथीदारांच्या सोबतीने ७ दुचाकी गाड्या चोरल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अमित सुतारला अटक केली आहे.

Beed Shocking
Shocking : आईला भूतबाधा झाली म्हणून मांत्रिकाला घरी बोलावले, तरुणाने मांत्रिकासह जन्मदात्या आईला केली मारहाण; महिलेचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com