पंकजा मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण

beed shivajinagar police charged pankaja munde supporters: बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधितांवर कलम 153 (अ), 153(बी), 295 (अ), 505 (2), 143, 149 भांदवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
beed shivajinagar police charged pankaja munde supporters
beed shivajinagar police charged pankaja munde supporters Saam Digital

एकात्मतेला बाधक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत बीड जिल्ह्यात सुमारे 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वणवे यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विषयी समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली हाेती. याच्या निषेर्धात बीड येथील शिरूर कासार येथे सकल ओबीसी बांधव तथा मुंडे समर्थकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता.

beed shivajinagar police charged pankaja munde supporters
संभाजीनगर महापालिकेने धाेकादायक इमारतींवर फिरवला बुलडाेझर;212 अतिक्रमणे रडारवर

यादरम्यान त्या ठिकाणी रॅली देखील काढण्यात आली होती. याच रॅलीमध्ये दशरथ वनवे, रामराव खेडकर, रामदास बडे यांच्यासह 15 ते 20 जणांनी एकात्मतेला बाधक वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या विराेधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

beed shivajinagar police charged pankaja munde supporters
Rain Hits Latur: पावसाचा धुमाकूळ, लातूरचे जनजीवन विस्कळीत;शिरूर अनंतपाळ- उदगीर, लातूर- उदगीर मार्गावरील वाहतुक ठप्प

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com