

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट
वाल्मीक कराडची तुरुंगात प्रकृती बिघडली
बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
पोटदुखीमुळे सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन करण्यात आले
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची तुरूंगात प्रकृती बिघडली. पोटदुखी तसंच अस्वस्थ वाटत असल्यामुळे वाल्मीक कराडला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याची सोनोग्राफी करण्यात आली असून बीपी आणि शुगरच्या देखील तपासण्या करण्यात आल्या. रिपोर्ट येताच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाल्मीक कराडवर उपचार केले जाणार आहेत.
वाल्मीक कराडला पोलिस बंदोबस्तामध्ये आज तुरुंगाबाहेर आणण्यात आले. वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली असून त्याच्यावरती बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच बरोबर वाल्मीकच्या पोटामध्ये दुखत असल्याने सोनोग्राफी त्याचबरोबर सिटीस्कॅन करण्यात येणार आहे. एकेकाळी बीड जिल्ह्यावर आणि मंत्र्यांसोबत वावरणारा वाल्मीक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जेलमध्ये आहे. आज प्रकृती बिघडल्यामुळे वाल्मीक कराडला तुरुंगाबाहेर आणण्यात आले. डोक्यावरील पांढरे केस, तोंडाला मास्क लावलेला आणि हात दोरखंडाने बांधलेल्या वाल्मीक कराडकडे सर्वजण पाहतच राहिले. पोलिसांच्या गरड्यामध्ये वाल्मीक कराडला जिल्हा रुग्णालय आणण्यात आले.
एकेकाळी संपूर्ण बीड जिल्ह्यावर दहशत आणि जिल्हा प्रशासनावरती वाल्मिक कराडची पगड होती. मात्र गेल्या वर्षभरापूर्वी तो संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये तुरूंगात आहे. प्रकृती बिघडल्यामुळे आज त्याला पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये बीडच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. अंगात गुलाबी रंगाचा शर्ट, वाढलेली दाढी, डोक्यावर पांढरे झालेले केस आणि हातामध्ये दोरखंड अशा अवस्थेत वाल्मीक कराड जिल्हा रुग्णाण्यात आला असताना त्याला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती.
वाल्मीक कराडला मोठ्या पोलिस बंदोबस्तामध्ये जिल्हा रुग्णालयात विविध चाचण्या करण्यासाठी आणले होते. वाल्मीक कराडचे पोट दुखत असल्याने त्याची सोनोग्राफी आणि सिटीस्कॅनची प्रक्रिया सुरू आहे. रिपोर्ट येताच पुढील उपचार सुरू करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मात्र सध्या तरी वाल्मिक कराड जिल्हा रुग्णालयात आहे. वाल्मीक कराडवर पुढे काय उपचार होात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. रिपोर्ट आल्यानंतर त्याच्याव नेमके काय उपचार करायचे यावर निर्णय घेतला जाईल. मात्र गेल्या दीड वर्षापासून वाल्मीक कराड जिल्हा कारागृहात असून त्याचे कार्यकर्ते खूपच चिंतेत आहेत. आज ना उद्या वाल्मीक कराड तुरुंगाबाहेर येईल अशी त्यांना आशा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.