पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं; भरतीवेळी तरुणाचा मैदानातच मृत्यू

beed police bharti 2026 : बीडमध्ये पोलीस भरतीवेळी तरुणाचा मैदानातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
beed police bharti
beed police bharti 2026Saam tv
Published On
Summary

बीडमध्ये १७४ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू

१६०० मीटर धावताना परळीतील दिपक वाव्हळ या उमेदवाराला भोवळ

डीहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटका येऊन दिपकचा मृत्यू

योगेश काशिद, साम टीव्ही

राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि मैदानी चाचणी सुरू आहेत. पोलीस भरतीसाठी प्रचंड उन्हातही हजारो उमेदवार मैदानात परीक्षा देण्यासाठी पोहोचले आहेत. बीडमध्येही १७४ पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. बीडमध्ये याच पोलीस भरतीवेळी एका तरुणाचा मैदानातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणाच्या मृत्यूने मैदानातील उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली.

बीडमध्ये पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाला भोवळ आली. त्याला भोवळ आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या उमेदवाराला डॉक्टरांनी मृत घोषित केले. डीहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दिपक वाव्हळ असे मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

परळीतील दिपक हा पोलीस भरतीसठी बीडमध्ये पोहोचला होता. पोलीस भरतीत आज १६०० मीटर धावण्याची परीक्षा होती. या परीक्षेमुळे सकाळपासून पुरेसे पाणी प्यायले होते. सकाळपासून पाणी न प्यायलेल्या दिपकला डीहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटका आला असावा. त्यानंतर दिपकला मैदानात भोवळ आली. भोवळ आल्याने दिपकला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या दिपकला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

beed police bharti
स्वेटर जळालेला, पायात चप्पल, हातात बंद घड्याळ; अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवार महत्वाचे बोलले

दिपकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर परीक्षा देण्यासाठी आलेल्या मित्रांमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी उमेदवारांना आरोग्याविषयी महत्वाच्या सूचना दिल्या. दिपकच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

beed police bharti
राज्यात १२ वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा सुळसुळाट, कुठे कुठे घडले गैरप्रकार?

वर्ध्यात पोलीस भरतीला प्रक्रियेला सुरुवात

वर्ध्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 134 जागांसाठी 7313 उमेदवार शारीरिक आणि मैदानी चाचणी देत आहे. पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. 5399 पुरुष आणि 1993 महिला उमेदवार मैदानी चाचणी देत आहे. भरती प्रक्रियेसाठी पोलीस मुख्यालयाचे मैदान तर 1600 मीटर धावण्यासाठी दत्तपुर बायपास करण्यात निश्चित आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com