Beed News
Beed NewsSaam tv

Beed News: परळी तालुक्यात श्वापदांची दहशत; लांडग्याने ६ शेळ्या केल्या फस्त

परळी तालुक्यात श्वापदांची दहशत; लांडग्याने ६ शेळ्या केल्या फस्त
Published on

बीड : बीडच्या परळी तालुक्यात श्वापदांची दहशत निर्माण झाल्याचे समोर आले आहे. (Parali) परळीच्या सरफराजपूर येथे लांडग्यांनी शेळ्यांवर हल्ला केला असून यामध्ये ६ शेळ्या लांडग्यांनी फस्त केल्या आहेत. (Live Marathi News)

Beed News
Jalgaon News: कामावरून घरी आल्‍यावर मुलीला पाहून आईला बसला धक्‍का

परळी तालुक्यातील सरफराजपूर हा बालाघाटाच्या डोंगर पट्ट्यात येणारा भाग असून या भागात अनेक वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. मोर, हरीण यासोबत अनेक वन्य प्राणी या भागात दिसून येतात. यादरम्यान सरफराजपूर येथील भरत रामभाऊ घाडगे या पशुपालकाच्या शेळ्यांवर लांडग्यानी शनिवार मध्यरात्रीच्या दरम्यान हल्ला केला. यामध्ये त्यांच्या ६ शेळ्या लांडग्यांनी फस्त केल्या आहेत.

नुकसान भरपाईची मागणी

दरम्यान या घटनेची माहिती समजताच महसूल विभागाचे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांनी (Forest Department) वनविभाग, पोलीस प्रशासन यांना पंचनामा करण्यासाठी कळवले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये दहशत पसरली असून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com