Beed News: हृदयद्रावक! शाळकरी मुलीला वाचवायला गेला अन् स्वत: ही बुडाला; पाझर तलावात बुडून दोघांचा मृत्यू

Ambajogai News: ही दुर्देवी घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
Beed News Two died after drowning in Pazar lake in Ambajogai
Beed News Two died after drowning in Pazar lake in Ambajogai Saam TV
Published On

Beed Ambajogai News Today

पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेली १२ वर्षीय शाळकरी मुलगी पाय घसरल्याने पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी १७ वर्षीय तरुणाने तलावात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

Beed News Two died after drowning in Pazar lake in Ambajogai
Goregaon Fire: मुंबईत अग्नितांडव! गोरेगावातील ५ मजली इमारतीला भीषण आग; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

अश्‍विनी लहु जाधव (वय १२ वर्ष) आणि रोहित परमेश्‍वर चव्हाण (वय १७ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दसरा सण जवळ आल्याने घरातील कपडे धुण्यासाठी अंबासाखर कारखाना (Beed News) परिसरातील दोन कुटुंब पाझर तलावावर गेले होते.

यावेळी कपडे धुत असताना अश्‍विनीचा पाय घसरला आणि ती थेट तलावाच्या पाण्यात पडली. आश्विनीला बुडताना पाहून रोहितने तलावात उडी घेतली. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Beed News Two died after drowning in Pazar lake in Ambajogai
Mla Disqualification Case: शिवसेना 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर; कोर्टाने दिली नवी तारीख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com