Mla Disqualification Case: शिवसेना 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर; कोर्टाने दिली नवी तारीख

Shivsena 16 Mla Disqualification Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, या प्रकरणाची सुनावणी आता महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे.
Supreme Court again postponed hearing of Shiv Sena 16 MLA disqualification case Latest Updates
Supreme Court again postponed hearing of Shiv Sena 16 MLA disqualification case Latest Updatessaam tv
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Shivsena 16 Mla Disqualification Case Updates

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, या प्रकरणाची सुनावणी आता महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी ३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Supreme Court again postponed hearing of Shiv Sena 16 MLA disqualification case Latest Updates
Breaking News: कोर्टाच्या दणक्यानंतर शिंदे सरकारचं एक पाऊल मागे; मविआच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती उठवली

आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची गेल्या महिनाभरातील ही चौथी वेळ आहे. याआधी तीनवेळा या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. १६ आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट (Uddhav Thackeray) आग्रही आहे. मात्र, सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत आमदार अपात्रतेची याचिका दाखल केली होती. कोर्टाने यावर सुनावणी घेत १६ आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं होतं.

मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं होतं. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं.

मग ६ ऑक्टोबर, त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचं ठरलं होतं. मात्र, आता ९ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता ३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तारखेला तरी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार, की पुन्हा नवी तारीख मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Supreme Court again postponed hearing of Shiv Sena 16 MLA disqualification case Latest Updates
Rashi Bhavishya: यशप्राप्ती होईल, आर्थिक प्रश्न मिटतील; 'या' राशींची सर्व संकटांपासून होणार मुक्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com