Beed Accident News : धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर कार - दुचाकीचा भीषण अपघात, वकीलासह तिघे जखमी

सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
beed accident news
beed accident newssaam tv

Beed News : धुळे - सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील (dhule solapur national highway) बीडच्या (beed) चौसाळा बायपास जवळ कार- दुचाकीचा भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

beed accident news
APMC News : फिफ्टी फिफ्टीतून एक फुटला... अर्जुनी माेरगावात 'मविआ' ची सरशी; पालम, चांदवड, देवळा बाजार समिती सभापती बिनविराेध

या अपघाताबाबत पाेलीसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - मंगळवारी रात्रीच्या सुमारास धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या चौसाळा गावाजवळ हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघे वीस फूटांवर जाऊन पडले. यामध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. तसेच कारचालक देखील जखमी झाला. या अपघातात कारचे माेठे नुकसान झाले आहे.

beed accident news
420 च्या तक्रारीवरुन Gautami Patil म्हणाली, मी तर... (पाहा व्हिडिओ)

या अपघातामध्ये अमोल बोडके (वय 30 राहणार बनगरवाडी ता. वाशी, जिल्हा धाराशिव) तसेच ऍड. अजित भैरट (वय 42 राहणार इजोरा ता. वाशी) अशी गंभीर झालेल्या जखमींची नावे आहेत. दरम्यान तिन्ही जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशी माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com