Ramdas Athawale: शरद पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे; मंत्री रामदास आठवले

शरद पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडाव; मंत्री रामदास आठवले
Ramdas Athawale Sharad Pawar
Ramdas Athawale Sharad PawarSaam tv

बीड : शरद पवार यांनी नागालँडमध्ये जो पाठिंबा दिला. तसा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला देखील पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा (Beed News) अनुभवी नेता आमच्यासोबत असला पाहिजे. त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं. असं आवाहन रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पवारांना केले आहे. (Maharashtra News)

Ramdas Athawale Sharad Pawar
SSC Exam: कॉपी बहाद्दरांकडून केंद्र संचालकासह, परीवेक्षकांना जीवे मारण्याची धमकी; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या बीड शहरातील नूतन कार्यालयाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील आढावा देखील आठवले यांनी घेतला. यानंतर माध्‍यमांशी त्‍यांनी संवाद साधला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते बीडमध्ये थांबले असता यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केले. पन्नास फुटांचा हार, जेसीबीवरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा स्वरूपात या उत्साही कार्यकर्त्यांनी आठवलेंचं स्वागत केले आहे.

आंबेडकर कुठेही गेले तरी आम्हाला फरक पडत नाही

दरम्यान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी ती किती टिकेल हे सांगता येत नाही असं भाकीत केले. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले असले तरी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com