SSC Exam: कॉपी बहाद्दरांकडून केंद्र संचालकासह, परीवेक्षकांना जीवे मारण्याची धमकी; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

कॉपी बहाद्दरांकडून केंद्र संचालकासह, परीवेक्षकांना जीवे मारण्याची धमकी; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
Jalna News SSC Exam
Jalna News SSC ExamSaam tv

जालना : जालन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान सेवलीतील जिल्हा परिषद शाळेच्या (ZP School) केंद्रावर काॅपी बहाद्दरांनी आपल्या पाल्याला आणि मित्रांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जिवे मारू अशा धमक्या (Jalna News) दिले. जर पोलिसांकडे किंवा कुठं तक्रार केल्यास तुम्हला सोडणार नाही; अशा स्वरूपाच्या धमक्या देत दगडफेक केल्याचा ही प्रकार झाल्याची घटना घडली. (Tajya Batmya)

Jalna News SSC Exam
Crime News: धक्कादायक प्रकार..पैशांसाठी राजस्थानमध्ये महिलांची विक्री; पीडीतेच्या सुटकेनंतर चार एजंट अटकेत

जालना तालुक्यातील सेवली येथील सेंटर हे कॉपी सेंंटर असल्याचे परिचित आहे. या केंद्रावर जवळपास ११ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या केंद्रावर जिल्हाधिकारी यांनी पहिल्याच पेपरला १६ विद्यार्थ्यांना रसतिकिट केल्यानंतर या सेंटरवरील कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची सक्त ताकीद दिली. यानंतर या सेंटरवर कार्यरत असलेल्या शिक्षकांनी कॉपीमुक्त अभियान राबविण्यास सुरवात केली. दरम्यान परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत आलेल्या नातेवाईकांनी बुधवारी परीक्षा केंद्रावर राडा घालत दगडफेक करत काॅपी चालू द्या, अन्‍यथा जीवे मारु अशी धमकी शिक्षकांना दिली.

शिक्षकांकडून लेखी तक्रार

सदर प्रकाराची वाच्यता केल्यास जिवंत सोडणार नाही? अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याने शिक्षक वर्गात एकच खळबळ उडाली. मात्र शिक्षकांनी जोपर्यंत पोलिस संरक्षण देत नाही, तोपर्यंत आम्ही कर्तव्य बजावत नसल्‍याची लेखी तक्रार करत धमक्या देणाऱ्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या लेखी तक्रारीनंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

एसआयटीने पेपर फुटी प्रकरणी एकास अटक

बुलढाणा ः एसआयटीने पेपर फुटी प्रकरणी रात्री अटक केलेल्या दानिश खा फिरोज खा याने स्वतःचा मोबाईल दुसऱ्याला वापरायला दिला होता. याचा प्रत्यक्ष सहभाग पेपर फुटीमध्ये असल्याने एसआयटीने रात्री उशिरा सिनखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन गावातून दानिश खा फिरोज खा याला अटक केली आहे. बुलढाणा येथील भारत विद्यालय केंद्रप्रमुखांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर परीक्षा सुरू असतानाही माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर प्रश्नपत्रिकेत दाखवून पेपर फुटीची पुष्टी केली होती. मात्र अद्याप या केंद्र प्रमुखावर कुठलीही कारवाई नाही. केंद्रप्रमुखांनी आपल्या खुलाशात चूक कबूल केली आहे. मात्र अमरावती विभागीय बोर्डाने अद्याप मोहन घोंगटे या केंद्रप्रमुखावर कारवाई केलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com