Crime News: धक्कादायक प्रकार..पैशांसाठी राजस्थानमध्ये महिलांची विक्री; पीडीतेच्या सुटकेनंतर चार एजंट अटकेत

धक्कादायक प्रकार..पैशांसाठी राजस्थानमध्ये महिलांची विक्री; पीडीतेच्या सुटकेनंतर चार एजंट अटकेत
Aurangabad Crime News
Aurangabad Crime NewsSaam tv

नवनित तापडीया

छत्रपती संभाजीनगर : राजस्थानमध्ये महाराष्ट्रातून महिला आणि अविवाहित तरुणी विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्‍याने (Aurangabad) औरंगाबाद शहरातील दोघांसह चार एजंटांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Live marathi News)

Aurangabad Crime News
Latur News: पत्‍नी माहेरी असल्‍याने व्‍यसनाच्‍या आहारी; यातूनच उचलले टोकाचे पाऊल

पडेगाव येथील महिलेला तीन लाख रुपयांमध्ये विकून जोधपूर येथील शेतकऱ्याशी लग्न लावल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारातील एजंट बन्सी मेघवाल, लीलादेवी मेघवाल, अरुण खान नजीर खान आणि शबाना हरून खान यांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी महिलेला कामाला लावून देण्याचे आमिष दाखवून औषध देवून तिला बेशुद्ध केले.

अत्‍याचार करून केला व्‍हीडीओ

औषध देऊन तिच्यावर बलात्कार करून त्याचे व्हिडिओ काढून बदनाम करू, या धमकीने महिलेला जोधपूरला नेले. तेथे महावीर आणि मनोज नावाच्या व्यक्तीने बलात्कार केला. यानंतर दिनेश भादूसोबत बळजबरीने लग्न लावले होते. मात्र या महिलेने घरातून पळ काढून स्थानिक पोलिस ठाणे गाठले आणि त्यानंतर संभाजीनगरमधील छावणी पोलिसांनी या एजंटचा भांडाफोड केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com