Beed : मोठी बातमी! मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडिओ क्लीपने खळबळ

Beed News : बीडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
BEED POLITICS HEATS UP AFTER VIRAL AUDIO CLIP, THREAT REMARKS AGAINST MANOJ JARANGE PATIL SPARK CONTROVERSY
BEED POLITICS HEATS UP AFTER VIRAL AUDIO CLIP, THREAT REMARKS AGAINST MANOJ JARANGE PATIL SPARK CONTROVERSYSaam Tv
Published On
Summary
  • बीडमध्ये व्हायरल झालेल्या फोन कॉलच्या ऑडिओ क्लिपमुळे नवा राजकीय वाद

  • ऑडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांना धमकी

  • व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही

बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सरपंच देशमुख आणि नंतर विलास घुले हत्या प्रकरणानंतर आधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, आता एका फोन कॉलच्या ऑडिओ क्लिपमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एका व्यक्तीकडून मनोज जरांगे पाटील यांना आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी देण्यात आली आहे. या कॉल रेकॉर्डिंगची कोणतीही पुष्ठी साम टीव्ही करत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. त्यानंतर रमेश घुलेविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा मुद्दा तसेच त्याचे वाल्मीक कराड याच्यासोबतचे फोटो यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

BEED POLITICS HEATS UP AFTER VIRAL AUDIO CLIP, THREAT REMARKS AGAINST MANOJ JARANGE PATIL SPARK CONTROVERSY
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांचे परळीतील समर्थक बाळासाहेब पाथरकर यांनी रमेश घुले यांच्यावर एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर एका अज्ञात व्यक्तीने पाथरकर यांना फोन केला. फोनवरील संभाषणादरम्यान संबंधित व्यक्तीने मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत शिवीगाळ केली इतकंच नाही तर, 'त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय" अशी धमकी सुद्धा दिली.

BEED POLITICS HEATS UP AFTER VIRAL AUDIO CLIP, THREAT REMARKS AGAINST MANOJ JARANGE PATIL SPARK CONTROVERSY
Health Care : जेवल्या जेवल्या लगेच प्रचंड झोप येतेय? तुमच्या ताटातच दडलंय 'हे' मोठं कारण

ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे बीडमधील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले असून समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपची अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे येणे महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com