बीड : विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यांचे आव्हान वाटत नाही. माजलगावच्या जनतेनेच परिवर्तन करायचं ठरवलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शंभर टक्के परिवर्तन होईल; असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांनी व्यक्त केला आहे.
बीडच्या (Beed) माजलगाव मतदारसंघात महाविकास आघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांनी आज साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांची प्रमूख उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारावर बोलताना त्यांनी आव्हान वाटत नसल्याचे सांगितले. तसेच माजलगाव मतदार संघातील जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला पवार साहेब यांनी संधी दिली आहे. बंडखोरांना पक्षश्रेष्ठी बोलावून समाधान करेल, असा विश्वास आहे. माजलगाव मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.