

Beed Latest News: बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र सुदैवाने वेळीच नातेवाईकांनी आणि शेजारच्यांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून वादग्रस्त शेतीच्या प्रकरणावरून पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कारभारावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीडमधील (Beed) शरद क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीवरून शेतकरी शरद क्षीरसागर यांच्याकडे असणाऱ्या जमिनीचा ताबा त्यांच्या बहिणींना देण्यात यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर पोलिसांनी महसूल पथक हे शेतात दाखल झाले होते.
मात्र उच्च न्यायालयाने सदरील आदेशाला स्थगिती दिली होती आणि हा आदेश असताना पोलीस प्रशासन ताबा देऊ पाहत होतो. यामुळेच शरद क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे केल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंंतर महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी म्हाला सदरील शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी कोर्टाच्या स्थगिती आदेशाची ऑर्डर दाखवली असता आम्ही त्या ठिकाणाहून निघून आलो. त्यामुळे त्यानंतर काय झालं? हे आम्हाला माहीत नाही," अशी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.