- सुशील थोरात
Nagar News : मिरजगाव येथे काही लोकांनी औरंगजेबाचे स्टेटस (Aurangzeb Photo Status) समाज माध्यमांत (social media) ठेवल्याने आज (गुरुवार) मिरजगाव (mirajgaon) मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने मिरजगाव बंदचे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास गावक-यांनी प्रतिसाद दिला आहे. (Maharashtra News)
याप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत एका युवकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र अजूनही तीन ते चार युवकांनी असेच प्रकार केल्याचा आरोप मिरजगाव शहरातील विविध हिंदू संघटनांनी केला आहे. त्या संशयिता आरोपींना अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गावक-यांना शांततेचे आवाहन
मिरजगाव हे अत्यंत शांतताप्रिय असून या गावात अशांतता पसरवण्याचे काम काही युवकांकडून होत असल्यामुळे या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज मिरजगाव बंदची (mirajgaon bandh) हाक देण्यात आली. त्यास प्रतिसाद मिळाला आहे.
या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता राखत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिवटे यांनी ग्रामस्थांना केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.