Beed News Suicide Case
Beed News Suicide CaseSaam tv

Beed: मुलाच्या आत्महत्येच्‍या आठ दिवसानंतर वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल

मुलाच्या आत्महत्येच्‍या आठ दिवसानंतर वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल
Published on

बीड : बीडच्या धारूर तालुक्यातील असोला गावात एका 27 वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. सदर घटना 8 दिवसांपूर्वी घडली असताना मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने वडिलांनी देखील गळफास घेऊन (Suicide) आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. (Beed News Suicide Case)

Beed News Suicide Case
Chalisgaon: वीज चोरी प्रकरणी २३ जणांवर गुन्‍हा; महावितरणची चाळीसगाव परिसरात कारवाई

बीड (Beed) येथील श्रीकृष्ण मोहन चोले (वय 27) असे मुलाचे नाव तर मोहन पंढरी चोले (वय 50) असे वडिलांचे नाव आहे. यांनी कोळपिंपरी शिवारातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलापाठोपाठ 8 दिवसातच वडीलांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

तेव्‍हा वडील होते पंढरपूर वारीत

मोहन चोले यांनी मुलाच्या विरहातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे; असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नेमके आत्महत्येचे कारण पोलीस तपासात स्पष्ट होईल. मुलाने आत्महत्या केली तेव्हा वडील हे पंढरपूर (Pandharpur) येथे वारीमध्ये गेले होते. त्यांना माहिती मिळताच ते गावी आसोला येथे परत आले. दरम्यान मुलाने गेल्या शुक्रवारी तर या शुक्रवारी वडीलांनी टोकाचे पाऊल उचलले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com