तरवाडे (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीच्या दोन पथकांनी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात विजेच्या चोऱ्या पकडल्या. या कारवाईत वीज चोरीच्या बदल्यात दंड दिला होता. या दंडाची रक्कम न भरल्याने (Police) पोलीसात सुमारे २३ गुन्हे दाखल केल्याने विज चोरांमध्ये धडकी भरली आहे. (Jalgaon News MSEDCL Action)
राज्यभर विज चोरी पकडण्यासाठी मोहिम सुरु आहे. याअंतर्गत (Chalisgaon) चाळीसगाव तालुक्याचे कार्यकारी अभियंता एस. आर. शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण व शहरी भागात वेगवेगळे भरारी पथक तयार करुन (MSEDCL) विज चोरांविरूद्ध कंबर कसली आहे. त्यात ग्रामिण भागातील दोन विभागीय कार्यालयातंर्गत एका पथकाने १६ तर दुसऱ्या पथकाने ७ अनधिकृतपणे मिटरमध्ये छेडछाड (Electricity Theft) करणे इतरत्र मार्गाने विजचोरी करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले. कारवाई करण्याकामी दोन पथकातील उपकार्यकारी अभियंता विनोद बाविस्कर, खिरवाडकर सह्हायक अभियंता महेश शेळके, प्रविण ब्राम्हणकार, हरी साळुंखे, मयूर कदम, नागदिवे, खंडोरे व जनमित्र, तंत्रज्ञ सुनिल चौधरी, कल्पेश महाले, राहूल महाजन, श्री. गायकवाड, श्री. आमले यांनी काम पाहिले.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
आनंदा पाटील (मांदुर्णे), महेंद्र पाटील (तामसवाडी), अशोक पाटील (तामसवाडी), विकास धनगर (उपखेड), दिलीप सुर्यवंशी(उपखेड), अयूब शेख (सायगाव), पंढरीनाथ पाटील (पिलखोड), जुबेर अख्तार (सायगाव), शरिफॉबी मोहंमद(पिलखोड), आनंदा पाटील (तामसवाडी), सुपडू डोंगरे (गणेशपूर), रतन धनगर (तांबोळा), भिकन पाटील (तांबोळा), रणजीत पाटील(तांबोळा), आबासाहेब पाटील (गणेशपूर), जावेद खाटीक (पिलखोड) तर दुसऱ्या पथकातील राजाबाई पाटील, देविदास पाटील (बोरखेडा पिराचे), वाल्मिक चौधरी (तरवाडे), लक्ष्मण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सरलाबाई पाटील (टेकवाडे), लक्ष्मण पाटील (खरजई) यांनी विद्यूत वितरण कंपनीने जेवढी विजेची चोरी केली. त्यापोटी विजेचे बिलाची रक्कम दिलेल्या वेळेत न भरल्यामुळे त्यांच्या विरुध्द पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.