Beed News
Beed NewsSaam tv

Beed: पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकराचा मृत्यू; विहिरीत पडलेल्‍या मुलासाठी आईने मारली उडी

पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकराचा मृत्यू; विहिरीत पडलेल्‍या मुलासाठी आईने मारली उडी
Published on

बीड : पाणी आणण्यासाठी गेलेल्या बीडच्या जीवाचीवाडी येथील ऊसतोड कामगार मायलेकरांचा विहिरीत पडून दुर्दैवी (Death) मृत्यू झाला. मुलगा विहिरीत पडल्‍याने त्‍याला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी मारली. ही घटना (Beed News) उस्मानाबादच्या विठ्ठल साई कारखाना परिसरात घडलीय. (Maharashtra News)

Beed News
Rohit Pawar: सत्‍य काय हे माहित नाही, परंतु खरा इतिहास लोकांना सांगा; आमदार रोहित पवार यांनी मांडले मत

सोनाली संतोष घुले (वय 24) व मुलगा सोहम घुले (वय 4) असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या मायलेकरांचे नाव आहे. केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील संतोष दशरथ घुले हे ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद जिल्ह्यातील विठ्ठलसाई साखर कारखान्यावर (Sugar Factory) बैलगाडी घेऊन ऊस तोडणीसाठी गेले आहेत. उसतोडच्‍या परिसरातच ही घटना घडली आहे.

मुलाला वाचविण्यासाठी आईची उडी

संतोष ‍यांची पत्नी सोनाली घुले आज मुलगा सोहम यास सोबत घेऊन पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी चिमुकला सोहम हा चालत–चालत गबार वजा विहीरीत पडला. त्यास वाचविण्यासाठी आई सोनाली यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र यावेळी दोघेही पाण्यात बुडाले. यामध्ये त्या दोघा मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने कारखाना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com