

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा लढा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून राज्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. कालपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी बसवर दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आजही बीड आणि कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.
आत्तापर्यंत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला (Maratha Reservation) वेगळे वळण लागले आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळले. बीडच्या (Beed) वडवणी शहरात आंदोलकांनी शासकीय कार्यालयांवर दगडफेक केली.
आंदोलकांनी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तहसील कार्यालय फोडले. या दगडफेकीनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तसेच बीडच्या धामणगावमध्येही मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा बांधवांनी बीड- कल्याण हा राज्य महामार्ग टायर जाळून अडवत रास्ता रोको सुरू केले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील त्या पध्दतीने आंदोलन करण्यात येतील, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.
कोल्हापूरमध्ये बसवर दगडफेक..
दरम्यान, बीडप्रमाणेच कोल्हापूरमध्येही (Kolhapur) मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापुर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्यासमोर बसवर दगडफेक करण्यात आली. मराठा आरक्षण मिळालच पाहिजे अशा घोषणा देत कुरुंदवाड-पुणे एसटीवर दगडफेक करण्यात आली असून घटनेची शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.